*प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा-विनोद धनगर*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा-विनोद धनगर*
*प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा-विनोद धनगर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आधुनिक संख्याशास्त्राचे जनक प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त, 29 जून रोजी, जिल्हा नियोजन समिती कार्यालयात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी उपसंचालक विनोद धनगर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. केंद्र शासनाने 2007 पासून 29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून या दिवसाचा उद्देश सामाजिक आणि आर्थिक नियोजन व धोरणांच्या आखणीमधील सांख्यिकीचे महत्त्व जनतेमध्ये, विशेषतः युवा पिढीमध्ये, रुजविणे आणि महालनोबीस यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी हा आहे. यावर्षीच्या सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकल्पना 'शाश्वत विकास ध्येये- 2 (Sustainable Development Goals-2)' ही होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, हे होते. यावेळी जिल्हा सांख्यिकी उपसंचालक विनोद धनगर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एल.के. कोकणी, भि.भि. भोये, संतोष बोदडे, सांख्यिकी सहाय्यक गोरखनाथ लहरे, संशोधन अधिकारी एस.एम. गवळी आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहून झाली. या निमित्ताने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 'शाश्वत विकास ध्येये -2' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.