*कॉपर वायर चोरीचे अजुन 02 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दाखल 2 गुन्हे उघडकीस, 2 लक्ष 12 हजार 100 रुपये किमतीची तब्बल 303 किलो कॉपर वायर हस्तगत, एकुण 3 आ

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कॉपर वायर चोरीचे अजुन 02 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दाखल 2 गुन्हे उघडकीस, 2 लक्ष 12 हजार 100 रुपये किमतीची तब्बल 303 किलो कॉपर वायर हस्तगत, एकुण 3 आ
*कॉपर वायर चोरीचे अजुन 02 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे दाखल 2 गुन्हे उघडकीस, 2 लक्ष 12 हजार 100 रुपये किमतीची तब्बल 303 किलो कॉपर वायर हस्तगत, एकुण 3 आरोपी ताब्यात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मागील काही दिवसांपूर्वी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भोणे, ढंढाणे, चाकळे, गंगापुर, तलवाडे खुर्द, ठाणेपाडा, आक्राळे, वासदरा अशा शेत शिवारातील सुझलॉन टॉवरमधील कॉपर केबल चोरी प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 228/2025 भा.न्या. संहिता कलम 303(2) प्रमाणे दि. 26 जून 2025 रोजी दाखल करण्यात आला आहे. सदर कॉपर वायर चोरीचे गुन्हयांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दि. 2 जुलै 2025 रोजी गुप्त माहिती मिळाली की, शनिमांडळ, रजाळे या गावातील सराईत आरोपी नामे सुकदेव आनंदा कोळी, दिनेश मोरे, भट्ट हटकर सर्व रा. शनिमांडळ ता.जि. नंदुरबार तसेच त्यांचे साथीदारांसह मिळून केला आहे, अशी खात्रिशीर माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास कारवाईकामी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तालुका पोलीस ठाणे हद्दीत जाऊन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने शोध घेतला असता वर नमूद आरोपींपैकी पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी, रा. रजाळे, ता.जि. नंदुरबार व राज ऊर्फ भटू भास्कर हटकर, रा.शनिमांडळ, ता. जि. नंदुरबार यांना यापूर्वीच दि. 28 जून 2025 रोजी दरोडयाचे गुन्हयात नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 229/2025 मध्ये अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील उर्वरीत संशयित इसमांचा शोध घेता सुकदेव आनंदा कोळी, हा रजाळे गावात मिळुन आला त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुकदेव आनंदा कोळी, वय 26, रा. रजाळे, ता.जि. नंदुरबार असे सांगितले. त्यास नमुद गुन्हयाबाबत विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्यांचे साथीदारांसह वर नमुद ठिकाणी कॉपर वायर चोरी केले असलेबाबत सविस्तर कबूली दिली. त्यापैकी दिनेश मोरे याचा शोध घेतला असता तो शनिमांडळ येथे त्याचे राहत्या घरी मिळून आला. त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे
नाव दिनेश सुरेश मोरे, वय 21 वर्षे, रा.शनिमांडळ, ता.जि. नंदुरबार असे सांगितले. त्यानुसार ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना गुन्हयातील चोरी केलेल्या मालाबाबत विचारपुस करता सदरचा माल सुकदेव कोळी याचे शेतात लपवून ठेवला असलेबाबत माहिती दिली. त्यानुसार स्था.गु.शा. पथकाने सुकदेव कोळी यांचे रजाळे येथील शेतात जाऊन तपासणी करता तेथे एकुण 2 लाख 12 हजार 100 रुपये किमतीचा अंदाजे 303 किलो सुझलॉन टॉवरमध्ये वापरण्यात येणारी कॉपर वायर मिळून आली आहे. तसेच ताब्यातील आरोपींची अधिकची सखोल चौकशी करता त्यांनी सुमारे दोन ते तीन महिन्यांपूर्वी चाकळे, गंगापुर, आखातवाडे, भोणे अशा शिवारात असलेल्या सुझलॉन टॉवरमधील तार चोरी केले असलेबाबतची कबुली दिली. त्याअन्वये तालुका पोलीस ठाणे येथील अभिलेखावरुन पळताळणी केली असता तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 174/2025 भा. न्या. संहिता कलम 303(2), 324(4) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे सदर गुन्हयातील मुद्देमाल हा आरोपींनी अश्पाक ऊर्फ जग्गु गुलाब सैय्यद, रा. जामचा मळा, चाळीसगाव रोड, ता.जि.धुळे यास विक्री केले बाबतची माहिती दिली त्यावरुन सदर अश्पाक सैय्यद यास स्था.गु.शा. पथकाने ताब्यात घेतले असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ मुकेश तावडे, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, विशाल नागरे, बापू बागूल, पोना/मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोकों/अभय राजपुत यांनी केली आहे.