*सशस्त्र दरोडयातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, संघटीतपणे जिल्हयात तसेच जिल्हयाबाहेर सशस्त्र रास्तालूट करणारे सराईत आरोपी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सशस्त्र दरोडयातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, संघटीतपणे जिल्हयात तसेच जिल्हयाबाहेर सशस्त्र रास्तालूट करणारे सराईत आरोपी*
*सशस्त्र दरोडयातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, संघटीतपणे जिल्हयात तसेच जिल्हयाबाहेर सशस्त्र रास्तालूट करणारे सराईत आरोपी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-दि. 30 मार्च 2025 रोजी मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी नामे बिज्या आरशी वळवी, रा. काठी, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार यांचे किराणा दुकानात एक भरधाव पिकअप वाहन घुसून अपघात झाला होता. त्यावेळी अपघातग्रस्त वाहनातील इसमांनी तेथून पळ काढला होता. सदर अपघातग्रस्त पिकअप वाहनामध्ये अवैध दारुचा साठा मिळून आला होता त्याचप्रमाणे वाहनात अग्नीशस्त्र व धारदार हत्यारे देखील मिळुन आली होती. अपघातग्रस्त वाहनातील इसमांना फिर्यादी ओळखत असल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरुन मोलगी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 51/ 2025 भा.न्या. संहिता कलम 310 (2), 281, 324(4), 3 (5) सह शरत्र अधि. कलम 4/25 प्रमाणे 4 इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांचेकडून तपास सुरु असतांना गुन्हयातील आरोपी राज्या ऊर्फ नागेश ऊर्फ नाकक्षा दमण्या वळवी (सराईत आरोपी), निरजा ऊर्फ निजा पोहल्या वसावे, भटेसिंग राण्या पावरा, बुधा ऊर्फ बुध्या कमा जांगडया, सर्व राहणार धडगाव जि. नंदुरबार अशांना यापुर्वीच सदर गुन्हयात अटक केली होती. यामधील आरोपी राज्या ऊर्फ नागेश ऊर्फ नाकक्षा दमण्या वळवी हा शरीराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हयांमधील सराईत आरोपी असुन त्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गोवा राज्यातुन दि. 8 मे 2025 रोजी ताब्यात घेतले होते.
नमुद गुन्हयातील आरोपी यांचे साथीदार हे फरार असल्याने त्यांचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत शोध सुरु होता. अटकेतील आरोपींची गुन्हयाबाबत सखोल चौकशी करता त्यामध्ये असे निष्पन्न झाले की, सदरचे आरोपी हे अवैधरित्या दारुचा व्यवसाय करणाऱ्या वाहनांची माहिती काढून ती वाहने मोलगी, धडगाव, तळोदा, अक्कलकुवा व गुजरात अशा ठिकाणी धारदार हत्यारांचा धाक दाखवून रास्तालूट करुन मुद्देमाल परराज्यात विक्री करीत असत. अटकेतील आरोपींकडून त्यांचे साथीदारांबाबतची माहिती घेण्यात येऊन त्यामध्ये साथीदार उमेदसिंग ऊर्फ उमेद ऊर्फ उमदया गोविंदसिंग पाडवी लक्ष्मण ऊर्फ लक्षा विक्रमसिंग वसावे असे मागील काही दिवसांपासुन फरार होते, त्यांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून वेळोवेळी घेण्यात येत होता, परंतु ते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना गुंगारा देत राजस्थान, आग्रा, दिल्ली अशा वेगवेगळया राज्यात पळ काढत होते.
दि.1 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, गुन्हयातील फरार असलेले सराईत आरोपी हे मालेगाव (सयाने) येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळालेवरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्था. गु.शा. पथक रवाना केले. सदर पथकाने मिळालेल्या माहितीचे वर्णनाप्रमाणे मालेगाव येथील सयाने गावात जाऊन आरोपींचा शोध घेतला असता ते गावात मिळून आले, त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे उमेदसिंग ऊर्फ उमेद ऊर्फ उमदया गोविंदसिंग पाडवी, वय- 27 वर्षे, रा. काटी, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार, लक्ष्मण ऊर्फ लक्षा विक्रमसिंग वसावे, वय 20 वर्षे, रा. काठी, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार असे सांगितले. त्यांना गुन्हयाबाबत विचारता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्याअन्वये फरार असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास यश मिळाले असून गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि- मुकेश पवार, पोहेकों/सजन वाघ, रमेश साळुंखे, पोना/जितेंद्र तोरवणे, पोशि/यशोदीप ओगले, रामेश्वर चव्हाण, भरत उगले यांनी केली आहे.