*वणीचे बाळासाहेब खैरे यांना मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचा "डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार" देऊन गौरव*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वणीचे बाळासाहेब खैरे यांना मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचा "डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार" देऊन गौरव*
*वणीचे बाळासाहेब खैरे यांना मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचा "डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार" देऊन गौरव*
यवतमाळ(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील वणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा "विदर्भ बहुजन साहित्य संघ" विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष अरुणकुमार खैरे यांना नुकतेच दिनांक 10 जून रोजी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते "डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार" देऊन गौरव करण्यात आले. सदर पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील समाज सेवकांना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. सदर पुरस्कार हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते राज्यातील समाजसेवकांना तसेच अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला मंत्री संजय राठोड, आमदार भरत गोगावले, आमदार संतोष बांगर व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. बाळासाहेब खैरे हे गेल्या 35 वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहे. त्यांनी "विदर्भ बहुजन साहित्य संघ विदर्भ प्रदेशच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या साहित्य संघाच्या 27 जिल्ह्यात शाखा असून मुंबईत सात शाखा कार्यरत आहेत. या माध्यमातून त्यांचे वृद्ध व्यक्ती, कुष्ठरोगी, शोषित पीडित, विद्यार्थी, गरीब, शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग इत्यादी व दलित तसेच आदिवासी करिता सामाजिक उत्थानाचे काम करीत असतात. त्याशिवाय अशा गरजूवंतांना कपडे वाटपाचे काम सुरू असते. बाळासाहेब हे आपली दिवाळी ही "विदर्भ बहुजन साहित्य संघाच्या" पदाधिकाऱ्यांसह कुष्ठरोगी, गरीब, अपंग, आदिवासी समाजाच्या लोकांना गोड खाऊ देऊन दिवाळी साजरी करतात. बाळासाहेब आपल्या वाढदिवसाची रक्कमही सेवाभावी संस्थेत देतात. त्याचप्रमाणे दर महिन्याला गोर गरिबांसाठी हजार ते दीड हजार रुपये महिन्याला खर्च करतात. देशावर आलेले संकट जसे भूकंप ग्रस्त पूर ग्रस्तांना आर्थिक मदत पाठवतात. त्यांनी अनेकदा विद्यालयातील गरीब विद्यार्थिनीला दत्तक घेतले असून त्यांचा शिक्षणाचा खर्चही केला आहे. त्यांनी गुटकाबंदी व व्यसनमुक्ती रॅली सुद्धा काढलेली आहे. त्यांचे एकंदरीत सेवाभावी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सन 2023 - 24 चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कारामध्ये निळा फेटा, बाबासाहेबांचे मोठा फोटो असलेले स्मृति चिन्ह, गुलदस्ता व रोख रक्कम समाविष्ट आहे. असे दलित आदिवासी, अंध, अपंग दिव्यांग साठी सेवा कार्य करणारे बाळासाहेब खैरे यांची जिल्ह्यातून एकमेव निवड झाली असून त्यांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार" मिळाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.