*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा- आ.श्रीजया चव्हाणांची विधानसभेत मागणी, मुख्यमंत्र्यानाही दिले निवेदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा- आ.श्रीजया चव्हाणांची विधानसभेत मागणी, मुख्यमंत्र्यानाही दिले निवेदन*
*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा- आ.श्रीजया चव्हाणांची विधानसभेत मागणी, मुख्यमंत्र्यानाही दिले निवेदन*
मुंबई(प्रतिनिधी):-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी वादळी वाऱ्यांमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विशेषतः केळी उत्पादकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याची मागणी आज विधानसभेत मांडली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे. आ. श्रीजया चव्हाण यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनांवरील चर्चेत ही मागणी केली. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या विषयाकडे त्यांचेही लक्ष वेधले. आपल्या निवेदनात आ. श्रीजया चव्हाण यांनी नमूद केले आहे की, 9 व 10 जून रोजी नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव, देगलूर, कंधार, धर्माबाद, मुखेड इत्यादी तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे सुमारे 4 हजार 800 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष करुन केळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे केळीच्या अनेक बागा संपूर्ण आडव्या झाल्या आहेत. प्रशासनाने पंचनामेही केले असून, मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला आहे.
या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी फक्त 1 हजार 314 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र पीक विमा घेतलेला नाही. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये विमा काढलेल्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना विमा कंपन्यांकडून जास्तीत जास्त भरपाई मिळवून देतानाच, विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही, शासनाकडून लवकरात लवकर व जास्तीत जास्त आर्थिक मदत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.