*खोंडामळी येथील गायत्री विद्यालय प्रांगणात भव्य योग शिबिराचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खोंडामळी येथील गायत्री विद्यालय प्रांगणात भव्य योग शिबिराचे आयोजन*
*खोंडामळी येथील गायत्री विद्यालय प्रांगणात भव्य योग शिबिराचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका भारतीय जनता पक्षातर्फे आज जागतिक योग दिनाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथील गायत्री विद्यालय प्रांगणात भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. पतंजली योग धामचे योग गुरु सैदाने यांनी योगाबद्दल मार्गदर्शन केले. मा. जि प अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांनी या शिबिरात सहभाग नोंदवत योगाभ्यास केला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. योगाभ्यास नंतर मा जि प अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांनी उपस्थित त्यांना योग दिनाचे महत्त्व सांगत माहिती दिली.