*नशेच्या गोळ्या विकणाऱ्याँ विरुद्ध अभियान, शहराचे पावित्रय सर्वांनी राखले पाहिजे-शहाजी उमाप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नशेच्या गोळ्या विकणाऱ्याँ विरुद्ध अभियान, शहराचे पावित्रय सर्वांनी राखले पाहिजे-शहाजी उमाप*
*नशेच्या गोळ्या विकणाऱ्याँ विरुद्ध अभियान, शहराचे पावित्रय सर्वांनी राखले पाहिजे-शहाजी उमाप*
नांदेड(प्रतिनिधी):-नांदेड शहर ही पवित्र भूमि असून येथे श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांचा पावन वास्तव्य आहे. या धार्मिक स्थळाचे पावित्रय राखणे सर्वांचे कर्तव्य आहे. नशा विकणाऱ्याँवर किंवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या विरोधात पाउले उचलण्यात येईल. असे आश्वासन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी शीख समाजाच्या शिष्ट मण्डळा सोबत चर्चा करतांना दिले.
मंगळवारी दुपारी संतबाबा बलविंदरसिंघजी करसेवावाले यांच्या शिष्टाइत एका शिष्ट मंडळा ने पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन शहरात नशेच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकल स्टोर्सवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली. नांदेड शहरात विशेषता गुरुद्वाराच्या भोवती व काही रस्त्यांवरील मेडिकल स्टोर्सवर असले प्रकार घडत आहेत. असंख्य युवक व काही नशेडी प्रवृत्तिचे लोकं वेगवेगळ्या गोळ्याँचे सेवन करुन गुन्हेगारीला प्रोत्साहन देताहेत. पोलीस विभागाने अशा लोकांविरोधात कडक पाउले उचलावित. पोलीस विभागाने जनते हेल्पलाइन सुरु करावी. संतबाबा बलविंदरसिंघजी, स. तेजपालसिंघ खेड, स. महेंद्रसिंघ, स. रविंद्रसिंघ मोदी, स. दीपकसिंघ हजुरिया, स. हैप्पीसिंघ रामगडिया, स. भगवंतसिंघ हजुरिया आदींनी यावेळी आपले मनोगत मांडले. शिष्टामंडळाशी चर्चा करतांना शहाजी उमाप पुढे म्हणाले की, जनसम्पर्कासाठी पोलीस विभागाच्या वेबसाइट संचालित आहेत. अशा गोष्टीन्ना आळा घालण्यासाठी जनतेसाठी एक हेल्पलाइन आजच कार्यान्वित करण्यात येईल. तसेच एक व्हाट्सप्प नंबर सुद्धा देण्यात येईल. नशा विकणाऱ्या किंवा पोलिसांना काही माहिती द्यायची असल्यास त्याचा लाभ होईल. शिवाय माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.
यावेळी चर्चेत नरेंद्रसिंघ ग्रंथी, गुलबिरसिंघ नवाब, विजयेंद्रसिंघ दफेदार, महादीप सिंघ महंत, जसप्रीतसिंघ होटलवाले सह वीस ते पंचवीस प्रतिनिधी उपस्थित होते.