*अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना माजी खा. डॉ. हीना गावीत यांच्या जन्मदिनानिमित्त साड्यांचे वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना माजी खा. डॉ. हीना गावीत यांच्या जन्मदिनानिमित्त साड्यांचे वाटप*
*अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना माजी खा. डॉ. हीना गावीत यांच्या जन्मदिनानिमित्त साड्यांचे वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-माजी खासदार डॉ. हिना गावित याच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकुवा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाण्याविहीर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गर्भवती महिलाना सकस आहाराचे किट आणि आकर्षक साड्यांचे वाटप करण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे आयोजित या कार्यक्रमाचे नेतृत्व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यानी केले. यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, सरपच जयमल पाडवी, विशाल तडवी, माजी उपसरपच जगदीश वसावे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भूषण पाडवी, लालसिग नाईक, सरपच भूपेंद्र पाडवी, सरपच सुरेश वसावे, सरपंच जयपाल वसावे, उदयसिग पाडवी, शुभम पाडवी, वैभव पाडवी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिसरातील मोठ्या सख्येने गर्भवती महिलानी या कार्यक्रमास उपस्थिती लावून उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसगी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यानी उपस्थित महिलाना गर्भावस्थेत सकस आहाराचे महत्त्व आणि या काळात घ्यावयाची काळजी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. माता सुदृद्ध तर संपूर्ण कुटुब सुदृढ असते,' असे सांगत त्यानी सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. ज्यामुळे महिलाना आपल्या आरोग्याविषयी अधिक जागरुक राहण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष, माजी भाजप जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यानी आपल्या भाषणात संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी महिलासाठी आणि अक्कलकुवा तालुक्यात केलेल्या लोकोपयोगी व कल्याणकारी कामाची माहिती दिली. गरोदर माताना सकस आहाराचे किट व साड्या वाटप करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना ते म्हणाले की, गरोदर अवस्थेत सकस व पोषक आहारामुळे गरोदर माता आणि जन्माला येणाऱ्या बाळाचे आरोग्य सुदृढ होते, ज्यामुळे भविष्यात त्याची शारीरिक व मानसिक सुदृद्धता सुनिश्चित होते. आदिवासी भागात गरोदर माता व नवजात बालकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागते. मात्र वेळीच खबरदारी घेऊन सकस आहार आणि आरोग्याची काळजी घेतल्यास नवजात बालकाच्या सर्वांगीण विकासासह कुटुबाचाही आर्थिक विकास साधता येतो, असे महत्त्वपूर्ण विचार त्यानी मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अनिल जावरे यानी केले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक शिस्तबद्ध आणि प्रभावी स्वरूप प्राप्त झाले. हा उपक्रम डॉ. हिना गावित याच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा एक भाग होता आणि त्यातून समाजातील एका महत्त्वाच्या घटकाला म्हणजेच गर्भवती महिलांना आरोग्य आणि सन्मानाचा हातभार लावण्यात आला.