*माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन*
*माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार मीणा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विविध विकास कामांच्या मुद्द्यांवर चर्चा देखील केली.
राजस्थानच्या सवाई माधोपूर येथील रहिवासी असलेले आयएएस अधिकारी राजेश कुमार मीणा यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ही भेट घेतली. मुख्य सचिव पदी रुजू झालेले राजेश कुमार यांना एक प्रयोगशील उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जाते. आयएएस झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळाला. तेव्हापासून गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले. महाराष्ट्र ओबीसी आरक्षणावर तोडगा काढणे, बाल आणि महिला विभागात नवोपक्रम, ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांना बचत गट तयार करून स्वावलंबी बनवणे, दुष्काळग्रस्त भागात पाणी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना शेती, नवीन पिके, उपकरणे आणि पिकांमध्ये नवोपक्रम वापरण्यास प्रवृत्त करणे ही त्यांची सर्वात महत्त्वाची कामे आहेत.