*नायगांव तालुक्यातील ग्रा. पं. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर,(19गावांत प्रस्थापित पुढाऱ्यांना सरपंच पदाची संधी)*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नायगांव तालुक्यातील ग्रा. पं. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर,(19गावांत प्रस्थापित पुढाऱ्यांना सरपंच पदाची संधी)*
*नायगांव तालुक्यातील ग्रा. पं. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर,(19गावांत प्रस्थापित पुढाऱ्यांना सरपंच पदाची संधी)*
नायगांव(प्रतिनिधी):-नायगांव तालुका पंचायत समिती कार्यालयात आज दिनांक 1 जुलै रोजी तीन वाजता तालुक्यातील 80 गावांचे 2025 ते 2030 या कार्यकाळासाठी सरपंच पदाचे आरक्षण उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार डॉ. धमप्रिया गायकवाड गट विकास अधिकारी संजय मिरजकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले असून अनेक गावात पूर्ववत जैसे थे आरक्षण असल्याचे दिसून येते. सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी 19 गावांचे आरक्षण जाहीर झाले असून ते पुढील प्रमाणे गडगा, मांजरम, कृष्णूर, बेटकबिलोली, ताकबीड, मोकासदरा, पाटोदा त.ब., कोलंबी, कोकलेगाव, लालवंडी, हंगरगा, कांडाळा, सालेगाव, कहाळा (खुर्द), परडवाडी, घुंगराळा , सातेगाव, धानोरा त.मा., टाकळी (त .मा.) या गावातील प्रस्थापित पुढाऱ्यांना सरपंच पदाची संधी आली आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी देखील 19 गावांचे आरक्षण जाहीर झाले असून पुढील प्रमाणे शेळगाव (गौरी), नरंगल, मांडणी, धनंज, नावंदी, रानसुगाव, वजीरगाव, अंतरगाव, अंचोली, बेंद्री, टेंभुर्णी, कुंचोली, गोळेगाव, नायगांव वाडी, हुस्सा, आलूवडगाव, भोपाळा, रुई (बु .) देगाव, औराळा या गावांत प्रस्थापित पुढाऱ्यांच्या सौभाग्यवती यांना सरपंच पदाची संधी मिळणार आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग करिता 10 गावच्या ग्रामपंचायत आरक्षण जाहीर झाले असून पुढील प्रमाणे कुंटूर, इकळीमाळ, इज्जतगाव, टाकळी (बु.), दरेगाव, मनुर त.ब., बळेगाव, सांगवी, डोंगरगाव, कारला त.मा., माहेगाव तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता 11 गावांचे आरक्षण जाहीर पुढीलप्रमाणे नरसी, बरबडा, राहेर, केदारवडगाव, सावरखेड, बळेगाव, सुजलेगाव, शेळगाव (छत्री), टाकळगाव, पळसगाव, इकळीमोर अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी 8 ग्रामपंचायती राखीव झाले असून पुढील प्रमाणे आरक्षीत आहेत तलबीड, राजगडनगर, कोठाळा, पिंपळगाव, मुस्तापूर, गोधमगाव, सोमठाणा, खंडगाव तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 9 ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत मुगाव, कहाळा (बु.), वंजारवाडी, चारवाडी, टाकळी (त.ब.), मरवाडी (तांडा), खैरगाव, निळेगव्हाण, धुप्पा तर अनुसूचित जमाती पुरुष प्रवर्गासाठी आणि महिला प्रवर्गासाठी प्रत्येकी दोन ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर झाले असून पुरुष प्रवर्गासाठी मरवाळी / कोपरा , रातोळी तर महिला प्रवर्गासाठी होटाळा, रुई (खु.) या ग्रामपंचायत साठी आरक्षण जाहीर झाले असून यावेळी तालुका परिसरातील आजी माजी सरपंच कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.