*जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातर्फे हॉकी खेळाडूंना मोफत प्रशिक्षण सुरू-सुनंदा पाटील*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातर्फे हॉकी खेळाडूंना मोफत प्रशिक्षण सुरू-सुनंदा पाटील*
*जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातर्फे हॉकी खेळाडूंना मोफत प्रशिक्षण सुरू-सुनंदा पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रीडा संस्कृतीचे संवर्धन आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात हॉकी खेळाचे मोफत आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण सुरू करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. राज्यात क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य राहण्यासाठी आणि खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. याच उद्देशाने, नंदुरबार येथे हॉकी खेळासाठी नवीन खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हॉकी खेळाचे प्रशिक्षण हे जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये विनामुल्य दिले जाणार असून जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी त्यांच्या विद्यालयातील हॉकी प्रशिक्षणाची इच्छा असलेल्या नवोदित विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशिक्षण केंद्र (हॉकी) येथे नियमित सरावासाठी पाठवावे. सरावासाठी आवश्यक असलेले क्रीडा साहित्य खेळाडूंना विनामूल्य पुरवले जाईल. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत राज्य क्रीडा मार्गदर्शक (हॉकी) भगवान पवार, यांच्याशी 9850559509 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.