*नंदुरबार दामजी पोसला गावित आयुर्वेदिक महाविद्याल व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोग निदान शिबिराचे उद्घाटन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार दामजी पोसला गावित आयुर्वेदिक महाविद्याल व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोग निदान शिबिराचे उद्घाटन*
*नंदुरबार दामजी पोसला गावित आयुर्वेदिक महाविद्याल व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रोग निदान शिबिराचे उद्घाटन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-डॉक्टर्स डे तसेच नंदुरबार जिल्हा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज नंदुरबार तहसील कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दामजी पोसला गावीत आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय आणि तहसील कार्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार सुरेखा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी देवमोगरा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गावीत हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन तहसीलदार मिलिंद कुलथे, नायब तहसीलदार नितीन पाटील, नायब तहसीलदार अजित शिंत्रे, अतिरिक्त नायब तहसीलदार नितीन पाटील संस्थेच्या सचिव डॉ विभुती गावीत, दामजी पोसला गावीत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुयोग व्यास यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 152 रुग्णांची रक्त लघवी, शुगर, बीपी, दमा, सांधेदुखी, मायग्रेन इत्यादी आजारांची तपासणी करण्यात येऊन व मोफत औषधे वितरित करण्यात आली तसेच के डि गावीत फिजीओथेरपी महाविद्यालयामार्फत डाॅ देवयानी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी चिकित्सा सुद्धा करण्यात आली.
या आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूकता मिळाली असून, अशा उपक्रमांची गरज अधिक असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डाॅ कमलेश खैरनार, डाॅ धनश्री पानपाटील, डाॅ स्नेहा कुंवर यांसह रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.