*ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
*ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दिनांक 21 जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून उत्साहाने साजरा करण्यात येतो. यावर्षी दिनांक 21 जून 2025 रोजी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने केंद्रीय आयुष मंत्रालयाने "Yoga for One Earth One Health" (एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग) ही संकल्पना राबविणेबाबत कळविले आहे. केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय योग दिन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याबाबत सर्व राज्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपल्या जिल्हयामध्ये डॉ विनय सोनवणे, जिल्हा शल्य, व डॉ नरेश पाडवी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने डॉ प्रीती पटले, वैद्यकीय अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत जगदीश चौधरी व दिपक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील डॉ सोनाली कुलकर्णी, डॉ भोये, डॉ अविनाश चकोर, श्रीमती दिनू वळवी , श्रीमती शुभांगी वळवी, मधुसूदन वाघमारे, कल्याण वसईकर तसेच इतर सर्व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता. सदर कार्यक्रमाचे आयोजन करतांना केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना व हस्तपुस्तिकेचा अवलंब करण्यात आला. डॉ सोनाली कुलकर्णी यांनी आरोग्यविषयक माहिती देऊन आभार व्यक्त केले.