*एकलव्य विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत*
*एकलव्य विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या दिवशी एकलव्य विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. संगीत शिक्षक रश्मिकांत त्रिवेदी व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासून अध्ययनाला सुरुवात करावी यासाठी पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी त्यांना शाळेबद्दलची माहिती देऊन शिस्त पालन करत अध्ययन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी वर्षभरात होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे व स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ शैलजा कापडिया, पर्यवेक्षक शंकर सोनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अजित लांडगे यांनी केले. भूपेंद्र पाटील, नितीन पाटील, सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, दीपक माळी, संभाजी गावित यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.