*जिल्हा परिषद गुजरभवाली शाळा प्रवेशोत्सव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा परिषद गुजरभवाली शाळा प्रवेशोत्सव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*
*जिल्हा परिषद गुजरभवाली शाळा प्रवेशोत्सव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गुजरभवाली येथे सन 2025-26 मध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश सोहळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार तसेच उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनिस पठाण, सरपंच रीना नाईक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश गावीत यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. शाळेचे उपक्रमशील व सर्जनशील मुख्याध्यापिका, सहाय्यक शिक्षिका, मोनी वळवी, मंगल कोकणी आदी यांनी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत एका आगळ्यावेगळ्या, नावीन्यपूर्णतेचे व मनमोहक पद्धतीने केले. लहानग्यांच्या शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात गोड, आनंददायी आणि प्रेरणादायी व्हावी यासाठी इयत्ता 3 री व 4थी च्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव करत मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला पाटील, पेन्सिल व गुलाब पुष्प देऊन स्वागतासाठी कल्पक उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाविषयी गोड आठवण आणि सकारात्मक भावना रुजेल, अशा प्रेरणादायी वातावरणात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश गुलशन या कंपनीचे शूज आणि पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे संवाद साधत विद्यार्थ्यांना शाळेत दररोज येण्यासाठी प्रेरणादायी गप्पा गोष्टी केल्या, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रश्नसह आपल्या मार्गदर्शनात, विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाच्या शुभेच्छा देत, शाळेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सरला नाईक व त्यांच्या संपूर्ण शिक्षक वर्गाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन शाळेचे सहाय्यक शिक्षक नितेंद्र चौधरी यांनी केले तर शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक बिरारी, सर्व अंगणवाडी सेविका आरोग्य स्टाफ, आणि विद्यार्थ्यांचे पालक आदी सर्वांनी सहकार्य केले.