*लाखापुर फॉरेस्ट येथे विद्यार्थ्यांची बैलगाडीवरून मिरवणूक, नवागतांचे वाजत गाजत स्वागत, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप, विद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांसाठी अनोखा सेल्फी पॉइं

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापुर फॉरेस्ट येथे विद्यार्थ्यांची बैलगाडीवरून मिरवणूक, नवागतांचे वाजत गाजत स्वागत, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप, विद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांसाठी अनोखा सेल्फी पॉइं
*लाखापुर फॉरेस्ट येथे विद्यार्थ्यांची बैलगाडीवरून मिरवणूक, नवागतांचे वाजत गाजत स्वागत, विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप, विद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांसाठी अनोखा सेल्फी पॉइंट*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात पाचवीच्या वर्गात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची बैलगाडीवर वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी तसेच सर्जा राजाला विशेष पद्धतीने सजावट करण्यात आले होते. गावातून हम सबका नारा है शिक्षा हमारा अधिकार है, असे अनेकविध पालकांना शिक्षण विषयक संदेशपर घोषणा देत प्रभात फेरी तून पालकांचे लक्ष वेधले होते होते.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर पवार, तळोदा पंचायत समिती सदस्य चंदन पवार, मुख्याध्यापक योगेश पाटील, अशोक ठाकरे, रूपसिंग ठाकरे, जितेंद्र ठाकरे, उपस्थित होते. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे मान्यवरांचे हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पाठ्यपुस्तक वाटप करून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. नवोदित विद्यार्थ्यांसाठी अनोखा असा सेल्फी पॉइंटचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित विद्यार्थी सेल्फी पॉईंट जवळ उभे राहून सेल्फी घेत नवीन विद्यालयाचा आनंद उत्सव साजरा करीत होते. इयत्ता पाचवी उत्तीर्ण सहावीत विद्यार्थी तसेच इयत्ता सहावी उत्तीर्ण इयत्ता सातवीत विद्यार्थी यांचे देखील नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, उपशिक्षक संजय पाटील, विनोद राणे,
मंगल पावरा, अशोक महाले,
फिरोजअली सय्यद, चंदू पाडवी, अनिल भामरे, सुवर्णा कोळी, लिपिक विजय पवार, शिपाई निलेश कुवर, सागर पाडवी यांनी परिश्रम घेतले.