*डी. आर. हायस्कूल मध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी. आर. हायस्कूल मध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत*
*डी. आर. हायस्कूल मध्ये नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल येथे आज शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची सुशोभित ट्रॅक्टरवर रॅली काढण्यात आली. यावेळी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नरेंद्र सराफ, सचिव प्रशांत पाठक ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य आ. बा. टेंभेकर, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक पंकज पाठक, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, हेमंत खैरनार या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट, गुलाबपुष्प व पेन देऊन त्यांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. अनोख्या व अनपेक्षित स्वागतामुळे नवागत विद्यार्थी व त्यांचे पालक सुद्धा भारावून गेले. पहिल्या दिवसाची शाळेबद्दलची भीती कळत नकळत त्यांच्या मनातून नाहीशी झाली व त्यांनी सुद्धा ढोल ताशांच्या गजरावर मान्यवरांसोबत ठेका धरला व संपूर्ण शालेय वातावरण आनंदी झाले. तदनंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.