*जि.प.व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची नियोजन बैठक संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि.प.व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची नियोजन बैठक संपन्न*
*जि.प.व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची नियोजन बैठक संपन्न*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची नियोजन बैठक डाब येथे माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी अक्कलकुवा विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वसावे, नितेश वळवी, मोलगी मंडळ तालुकाध्यक्ष आकाश वसावे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत, धनसिंग वसावे, रामसिंग वळवी, सरपंच वीरसिंग वळवी, बंडू वळवी, उपसरपंच मुकेश वसावे, मुकेश वळवी आदि प्रमुख उपस्थितीत होते.
भारतीय जनता पक्षाची मोलगी मंडळाची बैठक सातपुड्यातील डाब येथे माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी बोलताना डॉक्टर गावित म्हणाले की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी कामाला लागावे येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भारतीय जनता जनता पक्ष आपल्या विविध विकास कामांच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख नागेश पाडवी यांनी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागून केंद्र व राज्य शासनाने जनतेला दिलेल्या जनकल्याणकारी योजनांची घरोघरी पोहोचवून संपर्क साधावा गट विधानसभा निवडणुकीत जनतेने भरभरून आशीर्वाद दिले आहेत त्याची पुन्हा पुनरावृत्ती होईल यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, हीरसिंग वसावे यांनी देखील मार्गदर्शन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मगन राऊत, जयराम पाडवी, तुकाराम वाळवी, उपसरपंच विमलबाई पाडवी, जलसिंग पाडवी, रमेश पाडवी, दिनकर पाडवी, गणेश वसावे, शांती वसावे, ईश्वर पाडवी, रामा भगत, राया महाराज आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत डाब येथील काँग्रेसचे कार्यकर्ते खाल्या सत्या वसावे, सल्लीबार येथील काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य नवलसिंग वळवी, लालसिंग सेमट्या वळवी, कविता गणपत वळवी, दिनकर पाडवी सह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.