*जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा रायपाटण नं 1 च्या मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ निवृत्त*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा रायपाटण नं 1 च्या मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ निवृत्त*
*जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा रायपाटण नं 1 च्या मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ निवृत्त*
राजापूर(प्रतिनिधी):-जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा रायपाटण नं 1 च्या मुख्याध्यापिका सौ. नीलम थरवळ नियत वयोमानानुसार 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त त्यांचा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. रायपाटण मधील गेल्या दोन वर्षाच्या सेवेत त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे दोन्ही वर्षी त्यांचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेतही यश मिळवू शकले. त्यामुळे शाळेचे व गावचे नाव जिल्ह्यामध्ये झाले. यावर्षी दोन विद्यार्थ्यांची नवोदयला निवड झाली तर सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे. बाईंच्यामुळे शाळेची व विद्यार्थ्यांची प्रगती झाली असे उद्गार सर्वच मान्यवरांनी काढले. या कार्यक्रमाला पाचल बीटचे विस्तार अधिकारी बंडगर, जिजामाता विद्यामंदिर रायपाटणचे माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर, प्रभारी केंद्रप्रमुख अनाजी मासये, कोळंब शाळा मुख्याध्यापक जयेश तेलंग, जिजामाता विद्यामंदिर रायपाटण प्र. मुख्याध्यापक दामोदर लिंगायत, रायपाटणचे माजी सरपंच संदीप कोलते, व्यवस्थापन समिती शाळा रायपाटण नंबर 1 चे अध्यक्ष किशोर गुरव, ग्रामपंचायत सदस्य प्रिती नमसे, व्यवस्थापन समिती सदस्य विनायक निखांर्गे, गोपिनाथ नवरे आदी मान्यवर उपस्थित होते. पालक, ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी उत्तम सहकार्य केले त्याबद्दल मी आपली ऋणी आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊ शकले असे सौ. नीलम थरवळ यांनी सांगितले.