*जिजामाता महाविद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिजामाता महाविद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न*
*जिजामाता महाविद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिजामाता शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्षा श्रीमती शोभा दिलीप मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे, आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सतीश देवरे उपस्थिती होते.
जिजामाता महाविद्यालयात गेले 30-35 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करून अलीकडच्या काळात अनेक प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. अशा काही सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा एकत्रित संपन्न व्हावा. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा एकत्र करून त्यांच्या परिवारासह त्यांचा यथोचित सन्मान करावा ही सदिच्छा संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शोभा मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, संचालक ऍड राऊ मोरे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे महाविद्यालयातील सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांचा एकत्रित सेवापूर्ती सोहळा पार पडला. यावेळी सेवानिवृत्त झालेल्या अनेक प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी सेवा काळातील अनुभव व्यक्त केले. या प्रसंगी सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी सहपरिवार उपस्थित होते.यावेळी श्रीमती शोभा दिलीप मोरे, डॉ.अभिजीत मोरे, यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ सतीश देवरे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.डॉ. देविदास सोनवणे यांनी केले तर आभार प्रा डॉ.हेमंत रत्नपारखी यांनी मानले.