*कॉपर केबल चोरी करुन विक्री करणारी व चोरीचा माल विकत घेणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, 6 आरोपी ताब्यात, एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कॉपर केबल चोरी करुन विक्री करणारी व चोरीचा माल विकत घेणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, 6 आरोपी ताब्यात, एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत*
*कॉपर केबल चोरी करुन विक्री करणारी व चोरीचा माल विकत घेणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात, 6 आरोपी ताब्यात, एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-30 मे 2025 रोजी सुजलॉन कंपनीचे सिक्युरिटी सुपरवायझर पांडूरंग नमाईत व त्यांचा स्टाफ असे सुझलॉन येथे पेट्रोलींग करत असतांना 4 इसम हे 2 मोटारसायकल वर संशयितरित्या फिरतांना दिसुन आल्याने सुपरवायझर हे त्यांचेजवळ जात असतांना ते इसम पळू लागले त्यातील काहींना थांबवून सदर बाबतची माहिती सुपरवायझर नमाईत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास दिली. सदर बातमीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्था. गु.शा. पथकास खात्री करुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. सदर ठिकाणी स्था.गु.शा. पथकाने जाऊन सुपरवायझर व त्यांचे स्टाफ अशांनी संशयितरित्या फिरत असलेल्या 4 पकडलेल्या इसमांना त्याचे नाव मोईन शफी काकर, रा. लोहारी बुद्रुक ता. जि.जळगाव, ह.मु. घरकुल वसाहत साक्री रोड, नंदुरबार, इरफान ऊर्फ मोहम्मद भुऱ्या उस्मान काकर, रा. चिराग गल्ली, नंदुरबार, अजहर सलीम काकर, रा. काळी मशिदजवळ, नंदुरबार, जुबेर उस्मान काकर, रा.घरकुल वसाहत, साक्री रोड, नंदुरबार असे सांगितले. त्यांना विश्वासात घेऊन येथे का आले आहेत बाबत विचारता त्यांनी सुझलॉन टॉवरचे चोरीचे तांब्याची तार परशुराम ऊर्फ परशा भिल, रा. नवागाव ता.जि. नंदुरबार व त्याचे साथीदार यांचेकडून विकत घेण्यासाठी आले असल्याचे सांगितले व ते नवागाव गावाजवळ रोडावर तांब्याची तार घेऊन उभे असल्याचे त्यांनी कळविले. त्यानुसार लागलीच स्था.गु.शा. पथक नवागाव येथे रवाना झाले. सदर ठिकाणी रोडालगत काही इसम हे पांढऱ्या गोणीत काहीतरी घेऊन उभे असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांचे नाव देविदास भाईदास ठाकरे, धनराज चंद्रसिंग मोरे, दोन्ही राहणार नवागाव ता.जि. नंदुरबार असे सांगितले. त्यांचे ताब्यातील गोण्यांमध्ये एकूण 60,000 रुपये किमतीची 100 किलो वजनाची सुझलॉन टॉवरमधील चोरी केलेली तांब्याची तार मिळून आली. सदर तार बाबत त्यांना अधिकची विचारपूस करता त्यांनी नवागाव जवळ असलेल्या सुझलॉन टॉवरमधुन त्यांचे साथीदार परशुराम ऊर्फ परशा भिल संभाजी आनंद ठेंगे, दिलीप ऊर्फ दिल्या मिल, अजय पिंट्या भिल व इतर सर्व रा. नवागाव, ता.जि. नंदुरबार अशांनी मिळून चोरी केले, असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे 15 दिवसांपूर्वी देखील अशाचप्रकारे तांब्याची तार चोरी करुन मोईन काकर व त्याचे साथीदार अशांना विक्री केली असल्याचे त्यांनी कळविले. तरी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून सदर सुझलॉन टॉवरचे तांब्याची तार चोरी करुन विक्री करणारे व सदर चोरीची तार विकत घेणाऱ्यांना पकडण्यात यश मिळाले असुन आरोपींना तालुका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोह/मुकेश तावडे, रमेश साळुंखे, पोकों/रामेश्वर चव्हाण, अभय राजपूत यांनी केली आहे.