*मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, आरोपींकडून 74 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, आरोपींकडून 74 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत*
*मोलगी येथील महिलेच्या अंगावरील दागिने चोरणारे इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, आरोपींकडून 74 हजार 400 रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत*
नंदूरबार(प्रतिनिधी):-दि. 1 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनिय बातमीदारामार्फत गुप्त माहिती मिळाली की, नंदुरबार शहरात सोनार गल्ली परिसरात दोन संशयित इसम हे त्यांच्या ताब्यातील पिशवीत काहीतरी दागिने कमी दरात विक्री करण्याचे उद्देशाने फिरत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्था.गु. शा. पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेल्या गोपनिय बातमीनुसार सोनार गल्ली परिसरात येऊन शोध घेतला असता दोन इसम हे सोनार गल्लीत सोनार खुंट परिसरात प्लास्टीकचे पिशवीसह उभे असल्याचे दिसुन आले. स्था.गु.शा. पथकाने त्यांचेजवळ जाऊन विचारपुस करता त्यांनी त्यांचे नाव यासिन रईस मक्राणी, वय- 22 वर्षे, रा. आमलीबारी फाटा, अक्कलकुवा, जि. नंदुरबार, मुस्तकीम खान अब्दुल शकुर मक्राणी, वय-23 वर्षे, रा. इंदिरा नगर, अक्कलकुवा, जि. नंदुरबार असे सांगितले. त्यांना त्यांच्या ताब्यातील पिशवीत काय आहे याबाबत विचारण करता ते उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागल्याने स्था. गु.शा. पथकास त्यांचेवर अधिकचा संशय बळावल्याने त्यांचे ताब्यातील पिशवीची झडती घेता त्यात पांढऱ्या धातूचे दागिने दिसुन आले. सदर दागिने हे चोरीचे असल्याचे दाट संशय आल्याने स्था.गु.शा. पथकाने दोन्ही इसमांना अधिकचे विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी ते दागिने काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा ते मोलगी दरम्यान एका ठिकाणी महिला झोपलेल्या अवस्थेत असतांना तिच्या अंगावरुन काढून घेतले असल्याची माहिती दिली, त्याअनुषंगाने स्था.गु.शा. पथकाने
मोलगी पोलीस ठाणे येथे सदर बाबत माहिती घेऊन खात्री केली असता मोलगी पोलीस ठाणे येथे वरील हकिगतप्रमाणे गु.र.नं. 76/2025 भा. न्या. संहिता कलम 303(2), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले.
तरी सदर इसमांकडून एकुण 74,400 रुपये किमतीचे 800 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करुन मोलगी पोलीस ठाणे गु.र.नं. 76/2025 हा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास यश मिळाले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकों/मुकेश तावडे, मनोज नाईक, विशाल नागरे, राकेश मोरे, पोना/मोहन ढमढेरे, पोकों/अभय राजपुत, आनंदा मराठे, रामेश्वर चव्हाण यांनी केली आहे.