*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव निमित्त नंदुरबार धनगर समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व मोटारसायकल रॅली संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव निमित्त नंदुरबार धनगर समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व मोटारसायकल रॅली संपन्न*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव निमित्त नंदुरबार धनगर समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व मोटारसायकल रॅली संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-संपूर्ण भारतात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम व कार्यक्रम साजरा होत असताना लोककल्याणकारी कामे ही आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने केली पाहिजे अशी समाजसेवेची शिकवण संपूर्ण देशाला देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त नंदुरबार जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीने रक्तदानाचे महत्त्व आणि काळाची गरज ओळखून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत भव्य रक्तदान शिबीर व मोटारसायकल रॅली संपन्न करण्यात आली. नंदुरबार जिल्हा सकल धनगर समाज वतीने व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या सहकार्याने नंदुरबार शहरातील धुळे रोड येथील लायन्स हॉल येथे सकाळी 10:00 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे समाजबांधवांच्या शुभहस्ते पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले व रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली. सदर रक्तदान शिबिरात एकूण 30 जणांनी आपले रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देत समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते गौरवण्यात आले. रक्तदान शिबिरास भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शहराध्यक्ष नरेश कांकरिया तसेच नंदुरबार शहरासह तालुक्यातील घोटाणे, भोणे, ऐचाळे, खोकराळे, वैंदाणे येथील समाजबांधव यांनी उपस्थिती दर्शवली व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.
संध्याकाळी ठीक 5 वाजता भव्य मोटारसायकल रॅली आयोजित करत गांधी नगर पासून सुरुवात होऊन धुळे चौफुली, अंधारे स्टॉप, जुनी नगरपालिका, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विहीर, हाट दरवाजा, गिरीविहार ते सी. बी. पेट्रोल पंप पर्यंत समारोप करण्यात आला या भव्य मोटारसायकल रॅलीत मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी होत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत व भंडारा उधळत आनंदोत्सव साजरा केला. भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिष काटके व आभार प्रदर्शन छोटू कंखर यांनी केले तर भव्य रक्तदान शिबीर व मोटारसायकल रॅली यशस्वीतेसाठी सकल नंदुरबार जिल्हा धनगर समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव यांनी सहकार्य केले.