*श्री अजितनाथ जैन मंदिराला 100 वर्षे पूर्ण, आजपासून तीन दिवस कार्यक्रमांचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री अजितनाथ जैन मंदिराला 100 वर्षे पूर्ण, आजपासून तीन दिवस कार्यक्रमांचे आयोजन*
*श्री अजितनाथ जैन मंदिराला 100 वर्षे पूर्ण, आजपासून तीन दिवस कार्यक्रमांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील गणपती मंदिर रस्त्यावरील श्री अजितनाथ जैन मंदिराला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार ते रविवार असे हे कार्यक्रम होणार असून, सहभागी होण्याचे आवाहन श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे करण्यात आले. जैन धर्मीयांचे दुसरे तीर्थकर श्री अजितनाथ स्वामी यांचे नंदुरबारातील गणपती मंदिर रस्त्यावरील जयवंत चौकात भव्य मंदिर आहे. या मंदिराला आता 100 वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त शनिवारपासून कार्यक्रम होत आहे. 100 वर्षांपूर्वी जेठ सुद सवंत 1982 या दिवशी या मंदिराची अंजनशलाखा, प्राणप्रतिष्ठा झाली होती. आता 1 जून अर्थात जे सूद 6 सवंत 2081 या दिवशी 100 वर्षे पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षी 25 जानेवारी 2024 रोजी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. पांढऱ्या संगमरवरमध्ये नक्षीकाम करून आकर्षक व भव्य मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. तीन दिवसीय शताब्दी महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. शुक्रवारी सकाळी श्री महावीर जिनालय मध्ये ध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी बालक- बालिका कडून नाटीका सादर करण्यात आली. तसेच शनिवारी सकाळी श्री अजितनाथ जिनालय येथून भव्य शताब्दी शोभायात्रा काढण्यात आली. रात्री प्रभूभक्ती अहमदाबाद व मुंबई येथील संगीतकारांनी सादर केली. 1 जून रोजी नंदुरबार मंडन देवाधिदेव दुसरे तीर्थंकर श्री अजितनाथ भगवान यांच्या मंदिरातील 100 वी ध्वजा स्व. रत्नीदेवी सुमेरमल श्रीश्रीमाळ परिवारातर्फे ध्वजारोहण होणार आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविक आणि समाजबांधवांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, या कार्यक्रमांसाठी पंन्यासप्रवर चिरंतनरत्नविजयजी महाराज, मतिरत्नविजयजी महाराज जिनांगरत्नविजयजी महाराज, मुनिराज कुपांगरत्नविजयजी महाराज काव्यरत्नाश्रीजी महाराज आणि जलधिनिधीश्रीजी महाराज यांची उपस्थिती आहे.