*सैनिक हो,तुमच्यासाठी, नंदुरबारात 11 मे रोजी शिवसेनेची तिरंगा मोटर सायकल रॅली*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सैनिक हो,तुमच्यासाठी, नंदुरबारात 11 मे रोजी शिवसेनेची तिरंगा मोटर सायकल रॅली*
*सैनिक हो,तुमच्यासाठी, नंदुरबारात 11 मे रोजी शिवसेनेची तिरंगा मोटर सायकल रॅली*
नंदुरबार(प्रतिनिधी):-देशाच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणासाठी नापाक पाकड्यांना धूळ चारत आहेत. अशा परिस्थितीत सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी शहरातून शिवसेनेचा वतीने आज तिरंगा मोटार सायकल रॅली काढण्यात येणार असून, सर्व नागरिकांनी रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जांबाज सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबविले. त्यानंतर भारतीय सैनिकांनी दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत करीत नापाक पाकिस्तानवर हल्ले करीत त्यांचे मनसुबे उधळून लावलेले आहेत. देशाच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणासाठी पाकड्यांना धूळ चारत आहेत. 11 मे रोजी आपल्या भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहरातून तिरंगा मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. स. 10 वाजता सीबी पेट्रोल पंपापासून रॅलीला सुरुवात होईल. गिरिविहार गेट, उड्डाणपूल, हाटदरवाजा, सोनार खुंट, जळका बाजार, मोठा मारुती चौक, अंधारे चौक, आमदार कार्यालय, नगरपालिका व तेथून नेहरू चौकात रॅलीचा समारोप होईल. तिरंगा मोटार सायकल रॅलीत सर्व नागरिकांनी, शिवसैनिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सैनिकांचे मनोबल उंचावावे असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी केले आहे.