*नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार व नंदुरबार पंचायत समितीचे कृषीअधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांना राज्य शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार घोषित

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार व नंदुरबार पंचायत समितीचे कृषीअधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांना राज्य शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार घोषित
*नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार व नंदुरबार पंचायत समितीचे कृषीअधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांना राज्य शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार घोषित*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार तसेच नंदुरबार पंचायत समितीचे कृषीअधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांना राज्य शासनाचा सन 2023 - 24 चा गुणवंत अधिकारी पुरस्कार घोषित. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग मंत्रालय तसेच क्षेत्रीय स्तरावरील गुणवंत अधिकारी कर्मचारी गौरव करण्याची योजना, सन 2023 - 24 अंतर्गत यांच्या निर्णयानुसार ग्रामविकास विभागाअंतर्गत, राज्य शासनाच्या तसेच केंद्र पुरस्कृत अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात, अशा काही योजना प्रकल्प राबवितांना संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य पणाला लागते असे प्रकल्प पूर्ण करताना, अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये विशेष कौशल्य व गुणवत्ता आढळून येते, अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याची योजना शासनाने ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय 2 सप्टेंबर 2005 अन्वये सन 2005 - 6 पासून सुरू केले आहे, त्या अनुषंगाने सन 2023 - 24 यावर्षी ग्रामविकास विभागातील मंत्रालयातील व क्षेत्रीय स्तरावरील गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, तसेच नंदुरबार पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी नंदकिशोर भटू सूर्यवंशी यांना, गुणवंत अधिकारी पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सण 2023 - 24 या वर्षाकरिता 34 अधिकारी व कर्मचारी यांची या पुरस्कारासाठी अंतिम निवड करण्यात आले असल्याचे, महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रकामधून कळविण्यात आले आहे.