*नंदुरबार येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट व विविध सामाजिक संघटनेतर्फे महाबोधी विहार बौद्ध धम्म गुरु यांच्या ताब्यात द्यावे यासाठी रेल्वे स्टेशन येथे आंदोलन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट व विविध सामाजिक संघटनेतर्फे महाबोधी विहार बौद्ध धम्म गुरु यांच्या ताब्यात द्यावे यासाठी रेल्वे स्टेशन येथे आंदोलन*
*नंदुरबार येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट व विविध सामाजिक संघटनेतर्फे महाबोधी विहार बौद्ध धम्म गुरु यांच्या ताब्यात द्यावे यासाठी रेल्वे स्टेशन येथे आंदोलन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बुद्धगया बिहार येथील महाबोधि मंदिर 1949 च्या कायदा रद्द करुण महाबोधि महाविहार बौद्धधम्मगुरु यांच्या ताब्यात देण्यात यावे या करिता नंदुरबार रेल्वे स्टेशन येथे रेल्वेरोको आंदोलन करण्यात आले. नंदुरबार येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया गवई गट संत सेवालाल संघटना फाईट ग्रुप आणि विविध सामाजिक राजकिय संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने नंदुरबार रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र 1 या ठिकाणी 10 में रोजी सकाळी 11 वाजता केंद्र सरकार व बिहार सरकारचे लक्ष्य वेधण्याकरीता कायदा सुव्यवस्था राखत नंदुरबार रेल्वे स्टेशन येथे "रेल्वेरोको आंदोलन" करण्यात आले. आंदोलन कर्त्यांनी युद्व नको, बुद्ध पाहिजे महाबोधि विहार मुक्त झालेच पाहिजे झालेच पाहिजे 1949 मंदिर ऍकट कायदा रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे असे घोषणा दिल्या. कारण गेल्या 12 फेब्रुवारी 2025 माघ पोर्णिमे पासून बिहार बोधगया येथे महाबोधि महाविहाराच्या ताबा बौद्धधम्मगुरुंना मिळावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर भिक्खुसंघाच्या माध्यमातून मोठे आंदोलन सुरु आहे.
महाबोधि महाविहार ब्राम्हण सदस्याच्या ताब्यात असून त्यांच्या ताब्यातुन काढून ते बौद्धधम्म गुरुच्या स्वाधीन करावे त्याचप्रमाणे महाबोधि महाविहार ताबा बौद्धांना न मिळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बुद्धगया मंदिर कायदा 1949 आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे या मागणी करीता नंदुरबार येथे कायदा सुव्यवस्था राखत रेल्वेरोको आंदोलन करण्यात आले मोठ्या संख्याने पोलिस प्राशासनाचा बंदोबस्त होता. भारतातील हिंदुच्या मंदिरात सर्व हिन्दू ट्रस्टी आहेत ख्रीश्चनांच्या चर्च मध्ये ख्रिश्चन ट्रस्टी आहेत मुस्लिमांच्या मस्जित मध्ये मुस्लिम मौलाना ट्रस्टी आहेत जैन मंदिरात जैन ट्रस्टी आहेत तसेच शिखांच्या गुरुद्वारेत शिखधम्मगुरुच ट्रस्टी आहेत. मग महाबोधि महाविहारात पुरोहित ब्राम्हण ट्रस्टी का ? व त्यांच्या ताबा का? भारतासह जगभरातील आम्हा सर्व बौद्धांचे धार्मिक स्थान असलेले बोधगया येथील महाबोधि महाविहाराचा ताबा पुरोहित ब्राम्हण यांच्याकडून काढून बौद्धधम्मगुरु यांच्या स्वाधीन करावे तसेच बुद्धगया मंदिर 1949 च्या कायदा त्वरित रद्द करावा या मागणी करिता य 10 में रोजी सकाळी 11 वाजता नंदुरबार रेल्वेस्टेशन येथे कायदा सुव्यवस्था राखत रेल्वेरोको आंदोलन करण्यात आले वरील आंदोलनाचे नेतृत्व संजय सोनवणे RPI गवई गट युवक आघाडी नंदुरबार जिल्हाध्यक्ष तसेच अनिल पाटिल OBC आघाडी जिल्हाध्यक्ष, व आप्पा वाघ RPI गवई गट नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष, सुनील साळवे गवई गट नंदुरबार जिल्हाध्यक्ष, व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे नंदुरबार जिल्हा प्रभारी सुनील महिरे तसेच गोपी सामुद्रे सामाजिक कार्यकर्ता, श्यामा पवार राष्ट्रवादी भटके विमुक्त अध्यक्ष, आदि रेल्वेरोको आंदोलनात सहभाग घेतला तसेच विविध सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी रेल्वेरोको आंदोलनात सहभागी होते.