*गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविण्याकरिता परिचारिकांचे सक्षमीकरण आवश्यक-डॉ निलिमा सोनवणे*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविण्याकरिता परिचारिकांचे सक्षमीकरण आवश्यक-डॉ निलिमा सोनवणे*
*गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविण्याकरिता परिचारिकांचे सक्षमीकरण आवश्यक-डॉ.निलिमा सोनवणे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जागतिक परिचारिका सप्ताह (International Nurses Week) निमित्त दोन दिवसीय नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या डॉ निलिमा सोनावणे सहायक संचालक आरोग्य सेवा (नर्सिंग), यांनी शासकीय परिचर्या विद्यालय जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे भेट देऊन रुग्णालयांमध्ये पुरविण्यात येत असलेल्या सेवेबाबत पाहणी केली, तसेच परिचर्या संवर्गाशी त्यांना रुग्णसेवा देत असताना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्हा रुग्णालयातील कक्षाची पाहणी करून, विशेषतः स्वच्छता, औषधाची उपलब्धता व सुरक्षितता, अग्नी सुरक्षितता, emergency सेवा, in-service शिक्षणाबाबत निरीक्षण व माहिती घेऊन परिचारिकांना मार्गदर्शन केले.
तसेच रुग्णालयाने व नर्सिंग कॉलेज ने आयोजित केलेल्या औषध सुरक्षितता ( Drug Safety ) कार्य शाळेमध्ये नर्सेस ना मार्गदर्शन केले. तसेच अधिसेविका श्रीमती निलिमा पवार यांनी सुद्धा औषध सुरक्षितता बाबत परिचारिकांना मार्गदर्शन केले.
तसेच नर्सिंग कॉलेज ची पाहणी करून गुणवत्तापूर्वजक परिचर्या शिक्षण देण्याबाबत शिक्षक वृंदाना मार्गदर्शन केले. नर्सिंग शिक्षक ज्ञान व कौशल्यपूर्ण असून उच्च शिक्षित असेल तरच ते विद्यार्थी घडवू शकतात. त्याबाबत सर्व नर्सिंग शिक्षकांना शैक्षणिक कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी व अशा विविध विषयांवर माहिती घेतली व अधिसेविका निलिमा पवार मॅडम व प्राचार्य. महेंद्र वळवी यांना त्याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना पेशंट राईट (रुग्णाचे हक्क)व स्टॅंडिंग ऑर्डर याबद्दल उपस्थित परिचारिका, विद्यार्थी परिचारिका व शिक्षक यांना मार्गदर्शन केले, डॉ. निलिमा सोनावणे यांनी विद्यार्थी परिचारिका सोबत संवाद साधून त्यांच्या प्रशिक्षणावर विचारपूस केली तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जागतिक परिचारिका सप्ताह जगभरात दिनांक 6 ते 12 मे रोजी साजरा केला जातो. आधुनिक परिचारिका व्यवसायाच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन दिनांक 12 मे रोजी संपूर्ण जगभरात परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने त्यांनी नंदुरबार
तालुका विधायक समिती संचलित श्रीमती. विमलताई बट्टेसिंग नर्सिंग महाविद्यालयास भेट दिली. सदरील भेटीदरम्यान संस्थेचे समन्वयक एम. एस. रघुवंशी व प्राध्यापक. भूषण ठोंबरे यांनी डॉ.सोनावणे यांना महाविद्यालयातील उपलब्ध शैक्षणिक सुविधांबद्दल माहिती दिली तसेच यांनी छत्रपती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे भेट दिली व नंदुरबार सारख्या आदिवासी भागामध्ये महात्मा जोतिबा फुले योजना राबवून पुरवित असलेल्या आरोग्य सेवेबद्दल व इतर आरोग्य सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. व अशाप्रकारे शासकीय व खाजगी रुग्णालये मिळून गरीब आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्याचे सहकार्यातून दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे अध्यावत केंद्र असेल असा विश्वास व्यक्त केला. सदरील दौरा दरम्यान डॉ. सोनावणे यांनी खांडबारा ग्रामीण रुग्णालयास देखील भेट दिली व तेथील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. डॉ. निलिमा सोनावणे यांनी परिचारिकांना सदरील भेटीदरम्यान जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या व परिचारिका खऱ्या अर्थाने रुग्णसेवेचा व आरोग्य प्रणालीचा कणा असल्याचे प्रतिपादन केले. सध्याची आपल्या देशातील राष्ट्रीय स्थितीचा विचार करता परिचारिकांनी नेहमी सैन्यासारखे अलर्ट असावे व सद्यस्थिती लक्षात घेऊन परिचारिका दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन साध्या पद्धतीने करावे असा सल्ला दिला.