*विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम*
*विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम*
मुंबई(प्रतिनिधी):-विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई यांच्या वतीने शनिवार 10 मे 2025 रोजी सायं 6 ते 9 या वेळेत इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या करिअर संधी व नियोजन यावर करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर मार्गदर्शन कार्यक्रम न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय, इंडस्ट्रीयल इस्टेट कंपाऊंड, डॉ आंबेडकर रोड,चिवडा गल्ली, लालबाग मुंबई 12 येथे होणार असून प्रमुख पाहुणे डॉ संकल्प राव, संचालक ITM (Institute Of Health Science) यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाला समर्थ पालकर, संचालक समर्थ एज्युकेअर (विषय- 10, 12 वी नंतरच्या परदेशातील करिअर संधी), श्रीम. शर्मिला लोंढे, व्याख्यात्या करिअर समुपदेशक (विषय - 10 वी, 12 वी, नंतरचे करिअर पर्याय, आव्हान आणि नियोजन यावर मार्गदर्शन करणार आहेत 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी विकास शिंदे- मंडळ प्रमुख ९८७०४२२९५९, उमेश निंबरे - करिअर मार्गदर्शन केंद्र प्रमुख ९००४६७३२२४, अरुण तळगावकर सहा. करिअर मार्गदर्शन केंद्र प्रमुख ९४२१७४६२४९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने केले आहे.