*पत्र सूचना कार्यालय (पीआयबी-PIB) फॅक्ट चेक अर्थात तथ्य पडताळणी विषयक माध्यमांसाठी माहिती*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पत्र सूचना कार्यालय (पीआयबी-PIB) फॅक्ट चेक अर्थात तथ्य पडताळणी विषयक माध्यमांसाठी माहिती*
*पत्र सूचना कार्यालय (पीआयबी-PIB) फॅक्ट चेक अर्थात तथ्य पडताळणी विषयक माध्यमांसाठी माहिती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पत्र सूचना कार्यालय (पीआयबी-PIB) फॅक्ट चेक अर्थात तथ्य पडताळणी विषयक माध्यमांसाठी माहिती (9.5.2025 रोजी सकाळी 6:30 वाजेपर्यंत), भारतीय जनतेमध्ये भीती निर्माण करण्याच्या एकमेव उद्देशाने पाकिस्तानमधील काही समाज माध्यमांवरील हँडल्स आणि मुख्य माध्यमांनी एकत्रितपणे दिशाभूल करण्याची मोहीम चालवली आहे. पीआयबी अर्थात पत्र सूचना कार्यालय (Press Information Bureau - PIB) गेल्या काही आठवड्यांपासून या मानसिक पातळीवरील युद्धाचे सक्रीयतेने खंडन करत आले आहे. याव्यतिरिक्त, भारतीय माध्यमे आणि समाज माध्यमांचे वापरकर्तेही चुकीच्या माहितीला बळी पडत आहेत. पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक अर्थात तथ्य पडताळणी विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करत चुकीची माहिती, दिशाभूल करणारी माहिती आणि पूर्णपणे खोट्या असलेल्या बातम्यांचे खंडन केले आहे. 8 मे 2025 रोजी 22.00 वाजल्यापासून ते 9 मे 2025 रोजी 6.30 वाजेपर्यंत एकूण सात व्हिडिओंची तथ्य पडताळणी करण्यात आली. या व्हिडिओंच्या दुव्यासह तथ्य पडताळणी केलेल्या व्हिडिओंची यादी खाली दिली आहे. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने जालंधरमध्ये ड्रोन हल्ल्या झाला असल्याचा एक व्हिडिओसाठी मोठ्या प्रमाणावर प्रसारित केला जात होता. पत्र सूचना कार्यालयाने या व्हिडिओची तपासणी केली आणि तो खोटा व्हिडिओ असून, शेतात लागलेल्या आगीचा असल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये 7:39 pm ही वेळ दर्शवलेली होती, मात्र ड्रोन हल्ले त्यानंतर सुरू झाले होते. याच गोष्टीला जालंधरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. या व्हिडिओचा दुवा इथे दिला आहे.-
https://www.facebook.com/Jalandharadmin/posts/pfbid0E2xxyW8SYWWUD5Vaje3QwzL3r2zARR6d4hmSVfajgTbAsy1VFrBsqMxpfmkuiYdil?rdid=zONIbv21N1ARi71n#. पत्र सूचना कार्यालयाचा X या समाज माध्यमावरील दुवा-
https://x.com/PIBFactCheck/status/1920573308502004108. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्याची चौकी उद्ध्वस्त केल्याचा दावा, ऑनलाइन प्रसारित केल्या जात असलेल्या एका खोट्या व्हिडिओमधून केला जात आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवरील अनेक बनावट तसेच असत्यापित खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात सामायिक केला गेला. पत्रसूचना कार्यालयाने हा व्हिडिओ आणि त्यातील दाव्याची पडताळणी करून, त्यात केलेले दावे पूर्णतः खोटे आणि कारस्थानाचा भाग असल्याचे सिद्ध केले. मूळात भारतीय सैन्य दलात 20 राज बटालियन या नावाची लष्कराची कोणतीही तुकडीच नाही. जनतेची दिशाभूल करणे हाच या व्हिडिओचा उद्देश होता, आणि तो एका पूर्वनियोजित कारस्थानी प्रचार मोहिमेचा भाग होता. पत्र सूचना कार्यालयाचा X या समाज माध्यमावरील दुवा-
https://x.com/PIBFactCheck/status/1920563445700890909. पाकिस्तानने भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून भारतावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा करत असलेला एक जुना व्हिडिओ समाज माध्यमांवर सामायिक केला जात आहे. पत्र सूचना कार्यालयाने या व्हिडिओची तथ्य पडताळणी करून ही माहिती खोटी असल्याचे सिद्ध केले. सामायिक केलेला हा व्हिडिओ प्रत्यक्षात 2020 मध्ये लेबनॉनमधील बैरुत इथे झालेल्या स्फोटक हल्ल्याचा व्हिडिओ होता. हे खोटं वृत्त असल्याचे सिद्ध करणारा दुवा इथे दिली आहे - https://www.youtube.com/watch?v=DkykPt9ISyk,
पत्र सूचना कार्यालयाचा X या समाज माध्यमावरील दुवा-
https://x.com/PIBFactCheck/status/1920549148438245721,
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे लष्कराच्या ब्रिगेडवर हल्ला झाल्याची माहिती मोठ्या प्रमाणात शेअर आणि प्रसारित करण्यात आली होती. तथ्य पडताळणी नंतर, लष्कराच्या कोणत्याही छावणीवर फिदायिनी अथवा आत्मघातकी हल्ला झाला नव्हता असे पीआयबीने स्पष्ट केले आहे. केवळ दिशाभूल करण्याच्या आणि गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने हा खोटा दावा करण्यात आला होता. त्यानुसार हा व्हिडीओ चिन्हांकित करण्यात आला आहे. पत्र सूचना कार्यालयाचा X या समाज माध्यमावरील दुवा–
https://x.com/PIBFactCheck/status/1920533172405592286, एका गोपनीय पत्रात असा दावा करण्यात आला होता की, लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल व्ही. के. नारायण यांनी उत्तर कमांडच्या लष्करी अधिकाऱ्याला लष्करी सज्जतेबाबतचे गोपनीय पत्र पाठवले आहे. पीआयबीने त्याची सत्यता तपासून जनरल व्ही.के. नारायण हे सीओएएस नसून, हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. पत्र सूचना कार्यालयाचा X या समाज माध्यमावरील दुवा – https://x.com/PIBFactCheck/status/1920521614908928063, भारतीय लष्कराने अमृतसर आणि आपल्याच नागरिकांवर हल्ला करण्यासाठी अंबाला एअरबेसचा वापर केल्याचा दावा एका सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पीआयबीला हा दावा पूर्णपणे निराधार असल्याचे आणि एकत्रितपणे चुकीची माहिती प्रसारित करण्याच्या मोहिमेचा एक भाग असल्याचे आढळून आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पीआयबीने संरक्षण मंत्रालयाचे सविस्तर प्रसिद्धीपत्रक जारी करून सत्य उघड केले आहे. प्रसिद्धीपत्रकाची लिंक देण्यात आली आहे:-
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2127670, पत्र सूचना कार्यालयाचा X या समाज माध्यमावरील दुवा –
https://x.com/PIBFactCheck/status/1920506467536564710, भारतातील विमानतळांवर प्रवेशबंदी असल्याचा दावा करणारी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करण्यात आली होती. सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे पीआयबी ने या वृत्ताचे खंडन केले आहे आणि त्याला चिन्हांकित केले आहे. पत्र सूचना कार्यालयाचा X या समाज माध्यमावरील दुवा –
https://x.com/PIBFactCheck/status/1920536096951210303
पीआयबी खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी आणि मिथके उघडकीला आणून राष्ट्रीय हित जपण्यासाठी तसेच देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे.