*नंदुरबार येथे गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजने संदर्भात कार्यशाळा सपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजने संदर्भात कार्यशाळा सपन्न*
*नंदुरबार येथे गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजने संदर्भात कार्यशाळा सपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी या योजनेचा लाभ घेऊन तलावातील गाळ काढण्यासाठी आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठीचे अर्ज करुन पाणी टंचाईच्या संभाव्य त्रासातुन मुक्ती मिळण्यास मदत व्हावी म्हणून भारतीय जैन संघटनेने महाराष्ट्र सरकारशी झालेल्या करारानुसार नंदुरबार तहसिल कार्यालयात तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व तलाठी बांधवांची कार्यशाळा तहसिलदार मिलींद कुलथे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बी.जे. एस.चे या योजनेचे जिल्हाप्रमुख डॉ. कांतीलाल टाटीया यांनी दि.15 एप्रील ते 17 एप्रील पर्यंत नंदुरबार तालुक्यातील 25 च्यावर गावात या योजनेचा "प्रचार रथ" बी.जे.एस. मार्फत फिरला हे सांगत ही योजना अतिशय महत्वाची असुन यामुळे जलसाठ्या मधील गाळ काढला जातो, जलसाठयांची क्षमता पुर्नस्थापीत होते, गाळ शेतात पसरविल्यामुळे शेतीची सुपीकता सुधारते, मातीची ओलावा क्षमता वाढते, रासायनीक खताचा वापर कमी होतो. कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होते असे सांगीतले. 10 वर्षापेक्षा जुन्या जलसाठ्यांमधील गाळ काढण्यास प्राधान्य दिले जाणार असुन शासण गाळ मोफत काढुन देणार आहे. व गाळ वाहून नेण्यासाठी अल्प भुधारक, विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त
शेतक-यांना 37500 रुपयापर्यंत गाळ आपल्या शेतात वाहून नेण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देणार असल्याचे सांगीतले.
तहसिलदार यांनी योजनेचे महत्व लक्षात घेऊन, ती समजुन घ्या व मोठया प्रमाणात राबविण्याचे अहवान करत तालुक्यातील सर्व सरपंचाना बोलावून त्यांची कार्यशाळा घेण्याचे मनोगत व्यक्त केले. नाला खोलीकरण व पाणी साठयातील कीती गाळ काढावयाचा आहे त्याचे नियोजन करण्यासाठी तांतडीने आप आपल्या गावातील माहीती उपलब्ध करुन देणे बाबत त्यांनी उपस्थितांना सांगीतले. या योजनेचे बी.जे. एस.चे जिल्हा समन्वयक निलेश हिरे यांनी प्रत्यक्ष या संदर्भातील माहीतीचा अॅप कसे हाताळावा याचे प्रात्यक्षीक सर्वांकडून करुन घेतले. नंदुरबार तालुक्यातील बी. जे.एस.चे या योजनेचे प्रमुख नरेश कांकरीया यांनी आभार व्यक्त केले.