*भारतीय परंपरेत मानाचे स्थान असलेली आणि ऋषीमुनीच्या गो शाळेतील,जगातील सर्वात कमी उंचीच्या पुंगनूर गाईचे संवर्धन आमदार राजेश पाडवी यांच्या सोमावल येथील राहत्या घरी संगोपन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय परंपरेत मानाचे स्थान असलेली आणि ऋषीमुनीच्या गो शाळेतील,जगातील सर्वात कमी उंचीच्या पुंगनूर गाईचे संवर्धन आमदार राजेश पाडवी यांच्या सोमावल येथील राहत्या घरी संगोपन*
*भारतीय परंपरेत मानाचे स्थान असलेली आणि ऋषीमुनीच्या गो शाळेतील,जगातील सर्वात कमी उंचीच्या पुंगनूर गाईचे संवर्धन आमदार राजेश पाडवी यांच्या सोमावल येथील राहत्या घरी संगोपन*
शहादा(प्रतिनिधी):-अगदी प्राचीन काळापासून भारतीय परंपरेत मानाचे स्थान असलेली आणि ऋषीमुनी आपल्या गो शाळेत नेहमी पाळत असलेल्या
पुंगनूर गाय प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तिच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे जगातील सर्वात कमी उंचीच्या गाईचे संवर्धन व्हावे यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त तिची खरेदी केली असून सोमावल येथील राहत्या घरी संगोपन केले जाणार आहे. लहानशा आकारामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेली पुंगनूर प्रजातीची गाय जगातील सर्वात लहान गाय मानली जाते. साधारणता दीड ते दोन फूट उंचीची व लहान दिसणाऱ्या या गायीचे वैशिष्ट्यं मात्र इतर गायींपेक्षा खूपच वेगळे आहेत. तिचं दूध आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. त्यात 8% फॅट असतं, जे औषधी गुणधर्मांनी भरलेलं असतं. तुलनेत सामान्य गायीच्या दुधात फक्त 3 ते 3.5% फॅट असतं. दररोज 3 ते 5 लिटर दूध देणारी ही गाय केवळ 5 किलो चारा खाऊन तितकं उत्पादन देते. त्यामुळे ती आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरते सध्या तिच्या अस्तित्वावर संकट आहे, मात्र आंध्र प्रदेशात तिचं संवर्धन केलं जात आहे.
.पुंगनूर गायीचं मूळ आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील 'पुंगनूर' या गावात आहे. तिचं नावही तिथूनच पडलं आहे. ही गाय अवर्षण प्रतिरोधक आहे, म्हणजेच कमी पावसाच्या भागातही ती सहज तग धरते. त्यामुळे दक्षिण भारतासह दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये तिची मागणी वाढत आहे.
पुंगनुर गाय भारतीय परंपरेशीही जोडलेली असल्याने तिचे संरक्षण व संवर्धन आपल्या नंदुरबार जिल्ह्यात व्हावे यासाठी आमदार राजेश पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशातील चित्तूर येथून या गोवंश जोडीची खरेदी केली असून ते त्यांच्या स्वभावाला येथे राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे तेथे तिचे संगोपन केले जाणार असून हा लोप पावत असलेला गोवंश वाढीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रयत्न केले जाणार आहे अशी माहिती यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी दिली.