*'अवकाळी'मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा-डॉ.विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'अवकाळी'मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा-डॉ.विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश*
*'अवकाळी'मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा-डॉ.विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जोरदार वादळी पावसामुळे कांदा उत्पादकांना जबर फटका बसलाच त्याचबरोबर आंबा मका केळी पपई व अन्य फळ उत्पादकांचे देखील प्रचंड नुकसान झाले असून काही घरांची पडझड झाली आहे. त्याचा आढावा घेत महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील तहसीलदार व संबंधित अधिकारी यांना तातडीने पंचनामा करून भरपाई मिळवून देण्याविषयी निर्देश दिले. अधिक वृत्त असे की, 6 आणि 7 मे 2025 असे लागोपाठ दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यासह नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार झालेल्या वादळी पावसाने तडाखा दिला. शेतकरी बांधव झोपेत असतानाच त्यांचे टनोगंती कांदे भिजून गेले. नंदुरबार आणि शहादा तालुक्यात यंदा नंदुरबार जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आले असून बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा खळ्यात उघड्यावर आहे परिणामी अचानक आलेल्या पावसा मुळे शेकडो टन कांदा वाया जाण्याच्या स्थितीत आला. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला. नंदुरबार शहादा तळोदा आणि नवापूर तालुक्यात काढणीला आलेल्या पपई केळी आंबा कैरी मका आणि अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
दरम्यान, आज दिनांक 8 मे 2025 रोजी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अवकाळी ग्रस्त गावांमधील शेतीच्या नुकसानीची माहिती घेतली. अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या. दर काही महिन्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे याविषयी शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होताना दिसली. त्याचा आढावा घेत महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील तहसीलदार व संबंधित अधिकारी यांना तातडीने पंचनामा करून भरपाई मिळवून देण्याविषयी निर्देश दिले.