*आमदार किरण सामंत चषक 2025 मुंबईत प्रथमच भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमदार किरण सामंत चषक 2025 मुंबईत प्रथमच भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*आमदार किरण सामंत चषक 2025 मुंबईत प्रथमच भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
मुंबई(प्रतिनिधी):-दादा येडगे मित्र मंडळाच्यावतीने दि.27 एप्रिल रोजी मुंबईत प्रथमच आमदार भैय्यासामंत चषक 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आमदारपदी विराजमान झाल्यानंतर राजापूर -लांजा-साखरपा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार किरण सामंत यांच्या नावाने आमदार चषक 2025 चे आयोजन दादा येडगे मित्र मंडळाचे वतीने मुंबईतील अंधेरीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या भव्य मैदानात 27 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले आहे. यात एकूण 16 संघाचा सहभाग असेल तसेच प्रथम विजेत्या संघास रोख रक्कम रु. 51000 सह भव्य आमदार चषक प्रदान करण्यात येईल. यासाठी गेले अनेक जोरदार तयारी होताना दिसून येतेय. सध्या संपूर्ण देशात क्रिकेटचा फिवर शिगेला असताना सर्वाधिक तरूणाई या खेळाकडे आकर्षित झालेली दिसून येते. त्याच अनुषंगाने प्रथमच आयोजन असलेल्या आमदार चषकाकडे सर्वांच्या विशेष नजर आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक असलेले दादा येडगे आणि त्यांच्या सोबतीने संयोजक म्हणून राम जांगळे, तानाजी शेळके, राजू वरक, सुरेश बावदाणे, दशरथ जांगळे, संतोष बावदाणे, सूर्यकांत जांगळे, संदेश झोरे, प्रदीप झोरे, शांताराम शेळके, सुनिल झोरे आदि मंडळी विशेष मेहनत घेत आहेत. सोबतीने मार्गदर्शक म्हणून गणेश आडीवडेकर प्रवीण कानडे, अमित साळवी, आदिनाथ कपाले, विहंग खानविलकर, सुरेंद्र सौंदाळकर, योगेश चव्हाण, राजेश झोरे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. सदर स्पर्धेला अधिकाधिक क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहत सहकार्य करावे अशी विनंती आयोजक मंडळीच्या वतीने करण्यात आली आहे.