*अक्षय तृतीयेला जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी व्हावी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्षय तृतीयेला जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी व्हावी*
*अक्षय तृतीयेला जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी व्हावी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-थोर समाज सुधारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव अक्षय तृतीयेला असून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजन व विविध सामाजिक उपक्रम राबविण्याची मागणी महाराष्ट्र बसव परिषद आणि महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आली आहे. प्रतिवर्षी तिथीनुसार अक्षय तृतीयेला क्रांतीसुर्य, थोर समाज सुधारक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती असते. अनेक वर्षापासून मुंबईत मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर जयंती साजरा होत आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि विविध सामाजिक उपक्रम व्हावेत अशी मागणी महाराष्ट्र बसव परिषदेच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी डॉ. मिताली सेठी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थोर समाज सुधारक, महात्मा बसवेश्वर यांची जयंती अक्षय तृतीया बुधवार 30 एप्रिल रोजी आहे. यापूर्वी सन 2009 मध्ये महाराष्ट्र बसव परिषदेतर्फे जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी प्रशासनाला आदेश देऊन जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. मात्र गत दोन-चार वर्षापासून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय वगळता कुठल्याही शासकीय व निमशासकीय कार्यालयां मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती प्रतिमा पूजन होत असल्याचे दिसून येत नाही. मुंबईत मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयां मध्ये अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर जयंती साजरा करणे संदर्भात यापूर्वीच शासनाने अध्यादेश जारी केले आहेत.
राज्य शासनातर्फे राज्या तील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील सर्वच कार्यालयांमध्ये अंमलबजावणी करणे संदर्भात यापूर्वीच परिपत्रक पाठवले आहे.
लिंगायत धर्माचे संस्थापक क्रांतीसुर्य, थोर समाज सुधारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त अक्षय तृतीयेला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमापूजन करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू विठ्ठल हिरणवाळे तसेच श्रीमती सुलभा महिरे, सुरेखा वळवी, बी. डी. गोसावी, अशोक यादबोले, योगेश्वर जळगावकर, सुरेश जैन, संभाजी हिरणवाळे, भरत लगडे, राजेंद्र लगडे, प्रकाश घुगरे, जी. एस. गवळी, डॉ. गणेश ढोले, काशिनाथ हिरणवाळे, कैलास ढोले, सदाशिव हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे, जितेंद्र जगदाणे, अश्विन नागपूरे, विशाल हिरणवाळे आणि महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती पदाधिकारी व वीरशैव लिंगायत गवळी समाज बांधवांनी केली आहे.