*कत्तलीसाठी पिकअप वाहनात गायी कोंबून घेऊन जात असताना, 3 लक्ष 81 हजार रुपयांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलिसांच्या ताब्यात*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कत्तलीसाठी पिकअप वाहनात गायी कोंबून घेऊन जात असताना, 3 लक्ष 81 हजार रुपयांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलिसांच्या ताब्यात*
*कत्तलीसाठी पिकअप वाहनात गायी कोंबून घेऊन जात असताना, 3 लक्ष 81 हजार रुपयांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलिसांच्या ताब्यात*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-कत्तलीसाठी पिकअप वाहनात गायी कोंबून घेऊन जात असताना सापळा रचून 3 लक्ष 81 हजार रुपयांचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलिसांनी ताब्यात घेतला असून, वाहन चालकाविरुद्ध पशु संरक्षण अधिनियम व प्राण्यांच्या छळ अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील उदयपूर गावा जवळील मोतीमहल हॉटेलजवळ पिक अप वाहन क्रमांक एम एच 41 ए जी 0107 मध्ये कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या 5 गाई व 4 गोवंश गोर्हे निर्दयीपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने, सापळा रचून गाई व गोवंश व वाहन असा एकूण 3 लक्ष 81 हजार रुपयांच्या मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पोलीस शिपाई निशांत राजेंद्र गीते यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात, पशु संरक्षण अधिनियम व प्राण्यांच्या छळ प्रतिबंध अधिनियमानुसार आरोपी विजेसिंग मगन पाडवी रा. मिठाफळी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, उपअधीक्षक दत्ता पवार, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश वसावे करीत आहेत, या कारवाईने गाई व गोवंशतस्कारांमध्ये खळबळ उडाली असून, या कारवायांमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी केली जात आहे.