*इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत-चंद्रकांत पवार*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत-चंद्रकांत पवार*
*इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत-चंद्रकांत पवार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबारमार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये 1 ली इयत्तेसाठी शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये प्रवेश देण्यात येणार असून इच्छुक पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 21 मे 2025 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार येथे अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
प्रवेशासाठी अर्ज करताना खालील अटींचे पालन आवश्यक लाभ फक्त अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. रहिवासी दाखला पालक/पाल्य. पालकांनी विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत जोडावी. विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास संबंधित यादीतील अनुक्रमांक व दाखल्याची प्रत जोडावी. तसेच अनाथ/अपंग असल्यास दाखला जोडावा. शासकीय
/ निमशासकीय सेवेत कार्यरत पालकांनी नोकरीचे प्रमाणपत्र जोडावे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलता येणार नाही, त्याबाबत हमीपत्र जोडावे. महिला पालक विधवा/घटस्पोटीत/निराधार/परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला जोडावा.
पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे दाखल्याची सत्यप्रत जोडावी. इयत्ता 1 ली साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्ष पूर्ण असावे व जन्म दिनांक 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान झालेला असावा. दोन पासपोर्ट साईझ फोटो आणि जन्मतारखेचे (ऑनलाईन) दाखला आवश्यक आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे, वडीलाचे व आईचे आधार कार्ड अनिवार्य आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे.
विद्यार्थी व पालक यांना अटी व शर्ती व नियम बंधनकारक राहतील. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.
प्रवेश अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक ते कागदपत्रे जोडून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथे 21 मे, 2025 अखेर कार्यालयीन वेळेत जमा करावे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही प्रकल्प अधिकारी पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.