*श्री आई जाखादेवी कलामंच, मुंबई (भालावली -राजापूर) चे लोकप्रिय नमन 29 एप्रिल पासून कोकण दौऱ्यावर*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री आई जाखादेवी कलामंच, मुंबई (भालावली -राजापूर) चे लोकप्रिय नमन 29 एप्रिल पासून कोकण दौऱ्यावर*
*श्री आई जाखादेवी कलामंच, मुंबई (भालावली -राजापूर) चे लोकप्रिय नमन 29 एप्रिल पासून कोकण दौऱ्यावर*
राजापूर(प्रतिनिधी):-श्री आई जाखादेवी कलामंच, मुंबई (भालावली -राजापूर) चे लोकप्रिय नमनाचे नाव कोकणासह मुंबई पर्यंत दुमदुमत आहे दापोली, संगमेश्वर, लांजा, माणगाव आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी लोकप्रिय नमन सादर करून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. मुंबईसह कोकणात आणि तळकोकणात नमन कलेत प्रसिद्धीला आलेला कलामंच म्हणजे "श्री आई जाखादेवी कलामंच, मुंबई (भालावली -राजापूर )" नृत्यांगना यांचे सामूहिक नृत्य रसिक प्रेक्षकांना आकर्षित करत आहे तसेच नाव घेऊन नवविवाहित तरुणांना कलामंचातील विनोदी भूमिका साकारणारी "मावशी " म्हणजे नृत्यदिगदर्शक चेतन मोहिते यांची भूमिका आणि मंजुळ स्वरात गाणे गाऊन प्रेक्षकांना भुरळ घालणारी कु. मोनिका चव्हाण त्याच बरोबर सुमधुर आवाजात नारदाची मंजुळ गाणी यातून प्रसिद्धीस आलेले कलामंचाचे अष्टपैलू कलाकार आशिष गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे गण, गौळण आणि वगनाट्य याद्वारे समाज प्रबोधन करण्याचे काम लेखक / दिगदर्शक / गायक विजय केशव चौगुले उत्तम प्रकारे लेखणीद्वारे करतात व त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करून रसिक प्रेक्षकापर्यंत पोचविण्याचे काम कलाकार उत्तम करत आहेत. कलामंचाचे खजिनदार सचिन सांडये यांचे उत्तम नियोजन आणि संपूर्ण कमिटीची साथ यामुळे कलामंचातील आमूलाग्र बदल हे वेळोवेळी केले जातात आणि तेच बदल रसिक प्रेक्षकांना आकर्षित करतात. त्यातच यंदा "कोकणची कला याचा अभिमान आहे मला" हे ब्रीदवाक्य असलेले टी - शर्ट परिधान करून "कोकण दौरा" चालू होणार आहे कुणालाही आपल्या गावी श्री सत्यनारायण महापूजा किंवा इतर कार्यक्रमावेळी नमनाचा प्रयोग हवा असेल तर विश्वास गुरव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कला मंचच्या वतीने करण्यात आले आहे