*ओझर तांबळवाडी येथे सुवर्ण महोत्सवी पदार्पण हनुमान जन्मोत्सव 2025 मोठ्या उत्साहात संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओझर तांबळवाडी येथे सुवर्ण महोत्सवी पदार्पण हनुमान जन्मोत्सव 2025 मोठ्या उत्साहात संपन्न*
*ओझर तांबळवाडी येथे सुवर्ण महोत्सवी पदार्पण हनुमान जन्मोत्सव 2025 मोठ्या उत्साहात संपन्न*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे ओझर तांबळवाडी येथे सालाबाद प्रमाणे श्री हनुमान मंदिर देवस्थान तसेच श्री हनुमान जयंती उत्सव मंडळ तांबळवाडी यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी मंडळाचे 35 वे सुवर्ण पदार्पण वर्ष म्हणून साजरे करण्यात आले त्यानिमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा तसेच पंचक्रोशी वाडी मर्यादीत क्रिकेट स्पर्धानी उत्सवाची सुरुवात झाली. दिनांक 10 आणि 12 एप्रिल 2025 रोजी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी दुर्गादेवी गोसावीवाडी संघ ठरला तसेच दुसऱ्या क्रमांकावर यंग बॉईज तरळवाडी (तिवरे) संघाने बाजी मारली अतिशय रंगतदार क्रिकेट सामान्यांनी क्रीडा प्रेमी प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला होता. सुवर्ण महोत्सवी पदार्पण वर्षानिमित्त मंडळाने यावर्षी गावातील जुन्या खेळाडूंना संधी आणि जुन्या दिवसांची आठवण द्विगुणित करण्यासाठी प्रेक्षणीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते, अतिशय कमालीचा खेळ करीत सर्व जुन्या खेळाडूंनी यामधे सहभाग घेऊन खेळाचा मनोसोक्त आनंद लुटला. रात्री महिला मंडळ तांबळवाडी यांच्या वतीने विविध क्रीडा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामागे संगीत खुर्ची, चमचा गोटी, लंगडी, तसेच गरबा नृत्य असे अनेकविध स्पर्धा प्रकार आयोजित करून कार्यक्रमात उत्साह भरला. सर्व अबालवृद्ध,तरुण तसेच लहान मुलांनी यामध्ये सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकली आणि कार्यक्रमाचा आनंद घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. रात्री विघ्नेश्वर महिला भजन मंडळ तसेच गोसावी वाडी भजन मंडळ यांनी भजनाच्या माध्यमातून वातावरण भक्तिमय केले. त्यानंतर मंडळाच्या होतकरू कार्यकर्त्यांनी आपल्यातील कलाकार जागा रहावा यासाठी रात्री नमन कलेचा आविष्कार सुरू ठेवत वातावरण निर्मिती करीत आपल्या कलेची आवड जोपासली.
दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 5.30 वाजता जय हनुमान भजन मंडळाने उत्सवाची सुरुवात केली सकाळी 6.24 वाजता मारुती रायांचा जन्मोत्सव आणि अभिषेक सोहळा मंत्रोच्चाराच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात पार पडला. पाळणा गीत आणि काकड आरतीने वातावरण अतिशय मंत्रमुग्ध होत गेलं तद्नंतर लगेच मारुती रायांची पालखीने ग्रामदैवत आई दुर्गादेवी तसेच धनी रवळनाथ यांच्या भेटीसाठी प्रस्थान केले. संपूर्ण गावातून ढोलताशाच्या गजरात मिरवणूक पूर्ण करून पालखीने दुपारी 12 वाजता मंदिरात प्रवेश केला त्यानंतर सत्यनारण पुजा आणि आरती पार पडली. दुपारी 1 वाजता सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी 5 वाजता महिला मंडळ तांबळवाडी आयोजित हळदी कुंकू समारंभ आणि गरबा नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सायंकाळी 4 वाजता दिंडी आणि पालखी प्रदक्षिणा भक्तिमय वातावरणात पार पडली. रात्री 10 वाजता मान्यवर स्वागत आणि सत्कार समारंभ पार पडला त्यांनंतर रात्री 11 वाजता श्री रासाई उत्कर्ष नमन मंडळ कुवे यांनी आपली नमन कला सादर करत नमन प्रेमी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. अशा अनेकविध कार्यक्रमांनी भरलेल्या हनुमान जन्मोत्सव 2025 ची सांगता झाली. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला मंडळ त्याचप्रमाणें सर्व ग्रामस्थ आणि भाविक भक्तांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.