*मालमत्तेच्या गुन्हयातील निष्पन्न गुन्हेगारांची जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी,जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचना, सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मालमत्तेच्या गुन्हयातील निष्पन्न गुन्हेगारांची जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी,जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचना, सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष*
*मालमत्तेच्या गुन्हयातील निष्पन्न गुन्हेगारांची जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी,जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचना, सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांमधील मागील काही वर्षात चोरी, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी इ. असे मालमत्तेशी संबंधित गुन्हयांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असलेल्या आरोपींना संबंधीत पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची स्वतः पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचेसमक्ष सखोल चौकशी करुन त्यांचे चौकशी पत्र भरुन घेण्याचाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी आपआपले हडितील रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची सखोल चौकशी केली असुन जिल्हयाभरातील आतापावेतो 181 आरोपींची चौकशी करुन त्यांचे चौकशी पत्र भरुन घेण्यात आले आहेत. त्यामध्ये सदर आरोपी सद्यस्थितीत वास्तव्यास असलेल्या ठिकाणाची माहिती, सध्या करत असलेले काम व्यवसाय, मोवाईल क्रमांक, ओळखपत्र इ. अशी संपूर्ण माहिती चौकशी पत्रात नमुद करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे.
गुन्हेगारांवर अंकुश ठेवून भविष्यात त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा करु नये यासाठी त्यांना पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांचे मार्फत सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच येणाऱ्या उन्हाळी सुट्टीचे अनुषंगाने जिल्हयात मालमत्तेविषयक गुन्हयांमध्ये घट व्हावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी उचललेले हे एक महत्वाचे पाऊल आहे.