*देशातील पहिल्या आधार कार्डधारक महिलेला मिळाला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ- जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी दिला तात्काळ न्याय*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देशातील पहिल्या आधार कार्डधारक महिलेला मिळाला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ- जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी दिला तात्काळ न्याय*
*देशातील पहिल्या आधार कार्डधारक महिलेला मिळाला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ- जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी दिला तात्काळ न्याय*
नंदुरबार(प्रतिनिधी):-देशातील पहिल्या आधार कार्डधारक म्हणून गौरव मिळवलेल्या श्रीमती रंजनाबाई सदाशिव सोनवणे, (रा. टेंभळी, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांना जिल्हाधिकारीडॉ. मित्ताली सेठी यांच्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ मिळाला आहे. भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते देशातील पहिले आधार कार्ड मिळवण्याचा मान श्रीमती सोनवणे यांना मिळाला होता.
रंजनाबाई यांनी सदर योजनेअंतर्गत ‘नारी शक्ती दूत’ अॅपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेमार्फत नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक (बँक ऑफ इंडिया, लोणखेडा शाखा) व इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. मात्र, योजनेची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचे निदर्शनास आले.
पुढील चौकशीत असे स्पष्ट झाले की त्यांचे आधार कार्ड हे अंधेरी येथील आयडीबीआय बँकेशी संलग्न असून, त्यामुळे लाभाची रक्कम त्या खात्यात जमा झाली होती. यासंदर्भात बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेतील खात्यांची पडताळणी करण्यात आली.
प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दीपक गिरासे यांच्या तालुकास्तरीय यंत्रणांनी योग्य कार्यवाही केली. परिणामी, 21 एप्रिल 2025 रोजी श्रीमती रंजनाबाई यांना आयडीबीआय बँकेकडून योजनेअंतर्गत लाभांचा रु. 13500 चा धनादेश प्रदान करण्यात आला.
या प्रक्रियेमुळे ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ प्रत्यक्षात मिळाल्याने देशातील पहिल्या आधार कार्डधारक महिलेचा सन्मान अधिक वृद्धिंगत झाला असून, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यामुळे ही एक प्रेरणादायी, आनंददायी बाब श्रीमती रंजनाबाई सोनवणे यांच्या आयुष्यात घडली आहे. यावेळी रंजनाबाई सदाशीव सोनवणे टेंभली लाभार्थी, शैलेंद्र गवते निवासी नायब तहसिलदार,
सुदीप बर्वे शाखा व्यवस्थापक आयडीबीआय बँक शहादा, सागर चौधरी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी शहादा,
नितेश मोरे ग्राम महसूल अधिकारी लोणखेडा, उमेश सोनवणे रंजनाबाई सोनवणे यांचा मुलगा, संतोष जाधव ऑपरेशन मॅनेजर आयडीबीआय बँक शहादा हे उपस्थित होते.