*एकलव्य विद्यालयात रोबो क्लबची स्थापना*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात रोबो क्लबची स्थापना*
*एकलव्य विद्यालयात रोबो क्लबची स्थापना*
नंदूरबार(प्रतिनिधी):-पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार संचलित एकलव्य विद्यालय तथा ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या पंचवीस वर्षात विज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. शाळेने आता पर्यंत आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्ड, राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनं, राज्यस्तरीय विज्ञानातील स्पर्धा यात नाव मिळवलेले आहे. एकलव्य विद्यालयातील विज्ञान विभागात अनेक प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी चालवले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना विज्ञानासारख्या विषयांमध्ये आवड निर्माण होईल व विज्ञान विषयात गती येईल. यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच आधुनिक तंत्रज्ञानातील रोबोटिक्स चे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हावे व विद्यार्थ्यांनी स्वतःही रोबोटिक्स क्षेत्रामध्ये भविष्यात काम करावे हा हेतू ठेवून पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाने एकलव्य रोबो क्लब स्थापन करण्यात आला. एकलव्य रोबो क्लबचे उद्घाटन एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सुहासिनी नटावदकर यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी संस्थेचे समन्वयक रोहन नटावदकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात सुहासिनी नटावदकर यांनी ए आय तंत्रज्ञान काय आहे व विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व गणित यांचा संगम रोबोटिक्सचे तंत्रज्ञान अवगत करणे का आवश्यक आहे याबद्दल माहिती दिली. तसेच येत्या काळात एकलव्य रोबो क्लब कशा पद्धतीने कार्य करेल याबद्दलही माहिती सांगितली.
उद्घाटनासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या वेगवेगळे सेंसर व वेगवेगळ्या कामांमध्ये मदत करणाऱ्या 15 रोबोंबद्दलची माहिती मॉडेल व प्रात्यक्षिकांसह पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ, संस्थेचे विज्ञान प्रमुख मिलिंद वडनगरे यांनी दिली. भविष्यात विद्यार्थी कशाप्रकारे रोबो बनवू शकतात त्याचेही प्रात्यक्षिक देण्यात आले. विद्यालयाच्या या नवीन उपक्रमास संस्थेचे समन्वयक रोहन नटावदकर यांनी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओलंपियाड परीक्षा प्रमुख प्रकाश चौधरी यांनी केले. सूत्रसंचलन एकलव्य विद्यालय तथा ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान विभागप्रमुख सौ. मेधा गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. किरण रघुवंशी यांनी केले.
सदर उद्घाटन कार्यक्रमास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शिक्षक तथा प्रयोगशाळा कर्मचारी उपस्थित होते.