*जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची जिल्ह्याला भेट, महिला उद्योजकांशी साधला संवाद*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची जिल्ह्याला भेट, महिला उद्योजकांशी साधला संवाद*
*जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची जिल्ह्याला भेट, महिला उद्योजकांशी साधला संवाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी नुकताच नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील ग्रामसंघ, प्रभागसंघ आणि महिलांनी सुरू केलेल्या विविध उद्योग व्यवसायांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.
मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे ग्रामसंघ कार्यालयाला भेट दिली. त्यांनी ग्रामसंघ पदाधिकारी आणि महिलांशी संवाद साधून ग्रामसंघाच्या कार्याची पाहणी केली. बुधावल भागातील महिला मोठ्या प्रमाणात तीळ पिकवतात, यावर प्रक्रिया करून मोठा उद्योग कसा उभा करता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा अभियान सहसंचालक राहुल गावडे आणि अँकर पर्सन समीर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर, नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथे पीएमएफएमई (PMFME) योजनेंतर्गत सीड कॅपिटल व 35 टक्के क्रेडिट सबसिडीद्वारे चालवल्या जाणाऱ्या श्रीमती मयुरी चौधरी यांच्या खाकरा निर्मिती युनिटला भेट दिली. त्यांनी या उद्योगाची सविस्तर माहिती जाणून घेतली आणि या व्यवसायासाठी सौर ऊर्जा वापरण्याची शक्यता तपासण्यासाठी लवकरच राज्य कक्षामार्फत तज्ञांना पाठवण्याचे आश्वासन दिले.
तसेच कोपर्ली (ता. नंदुरबार) येथील विकास महिला प्रभागसंघाच्या मासिक बैठकीसाठी न्याहली येथे भेट दिली. त्यांनी प्रभाग संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रभागस्तरीय तसेच ग्रामसंघ स्तरावर मोठे उद्योग उभे राहण्यावर जोर दिला. तसेच पातोंडा (ता. नंदुरबार) येथे दशा मा महिला स्वयंसहायता समूहामार्फत चालवल्या जाणाऱ्या दशा मा मिरची कांडप युनिटला भेट दिली. त्यांनी मिरची कांडप युनिटची माहिती घेतली आणि मिरची पावडरची विक्री वाढवण्यासाठी ब्रँडिंग, पॅकिंग आणि मार्केटिंगबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी आरएसईटीआय (RSETI) च्या प्रशिक्षण स्थळाला भेट देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
या भेटीनंतर कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली, जिथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी लखपती दीदी यांच्याशी संवाद साधला. निलेश सागर यांनी अभियानांतर्गत महिलांनी लावलेल्या स्टॉल्सला भेट देऊन त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची माहिती घेतली. शेवटी, जिल्हास्तरीय सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात उत्कृष्ट काम उभे करण्याच्या सूचना दिल्या. या दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हास्तरीय जिल्हा व्यवस्थापक आणि तालुकास्तरीय तालुका अभियान व्यवस्थापक यांच्यासह सर्व टीमने परिश्रम घेतले.