*एप्रिल महिन्यातील विभागीय लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिन मंगळवारी होणार*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एप्रिल महिन्यातील विभागीय लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिन मंगळवारी होणार*
*एप्रिल महिन्यातील विभागीय लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिन मंगळवारी होणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवार, दिनांक 15 एप्रिल, 2025 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागीय महसूल उपायुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली आहे. दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने लोकशाही दिन उपक्रम मंगळवारी होणार आहे. नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता होणारा विभागीय लोकशाही दिन कार्यक्रम विभागातील सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दाखल झालेली प्रकरणांबाबत तक्रारदार समाधानी नसतील तर तेच या लोकशाही दिनामध्ये अर्ज दाखल करु शकतात. दरम्यान, याच वेळेस विभागीय महिला लोकशाही दिनाचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेद्वारे सोडवणूक करण्यासाठी या दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ज्या समस्याग्रस्त व पीडित महिलांनी तालुकास्तर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केलेले असतील व त्यांच्या समस्येचे उत्तर मिळाले नसेल, त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह त्यांचे अर्ज दिनांक 15 एप्रिल रोजी विभागीय महिला लोकशाही दिनात सकाळी 11 वाजता सादर करावेत, असे आवाहन महिला व बालविकास विभाग, नाशिकचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी केले आहे.