*अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची नेहरू विज्ञान केंद्राला भेट*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची नेहरू विज्ञान केंद्राला भेट*
*अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची नेहरू विज्ञान केंद्राला भेट*
सुरगाणा(प्रतिनिधी):-अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची नेहरू विज्ञान केंद्राला भेट. अनुभवले मुंबईचे जीवन. प्रयोगशील, उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख. राबविला वैशिष्ट्य पुर्ण अभिनव उपक्रम. यापुर्वी 'मिशन नवोदय" हा उपक्रम तालुक्यात फलदायी ठरला आहे. सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या सुरगाणा तालुक्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांची आय आय टी मुंबई येथे भेट देत मुंबईचे जीवन प्रथमच अनुभवले.पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सुरगाणा सायन्स टॅलेंट सर्च या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून एरव्ही तालुका, जिल्हा न पाहिलेल्या मुलांना मुंबईची सफर घडवून आणल्याने पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुका स्तरावर परीक्षा घेऊन गुणवत्ता यादीतील एकूण छत्तीस विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना पंचायत समितीच्या सेस फंडातून तरतूद करण्यात आलेल्या निधीतून आय आय टि मुंबई, नेहरु सायन्स सेंटर, नेहरू तारांगण या स्थळांना भेटी देण्यासाठी एकदिवसीय वैज्ञानिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना लक्झरी बसमधून आयआयटी मुंबई
कॅम्पसमधील सेंट्रल लायब्ररी, टिंकरर्स लॅब,धातू विज्ञान विभाग येथे भेट देऊन सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विशेष बाब म्हणून आय आय टी मुंबई येथील पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. पराग भार्गव यांनी आदिवासी विद्यार्थ्यांशी
संवाद साधत त्यांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती देत मार्गदर्शन केले. नेहरु सायन्स सेंटर येथे मॉडेल्स व प्रेझेंटेशन च्या मदतीने वैज्ञानिक संकल्पना समजावून घेतल्या. नेहरु तारांगण येथे थ्रीडी शोच्या माध्यमातून अंतराळातील सौर मंडळ ग्रह, तारे, उपग्रह याबद्दल माहिती जाणून घेतली. नुकत्याच अवकाशातून परतलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम, बुथ्स बिलमोर, कल्पना चावला या अंतराळवीर शास्त्रज्ञांची माहिती करून घेतली. या वैज्ञानिक सहलीत उप शिक्षणाधिकारी धनंजय कोळी, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप नाईकवाडे, डॉ. नेहा शिरोरे, प्रमिला शेंडगे, महेश नेहे, नरेंद्र कचवे, शिक्षक उत्तम वाघमारे, अशोक गायकवाड, लक्ष्मण चौधरी, भास्कर झिरवाळ, अजय निटुरे, गणेश पाडवी, फिरोज शेख, योगीता महाले यांनी सहभाग घेतला. उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.