*अक्कलकुवा तालुक्यातील सर्व गौण खनिज वाहतूक करणारे वाहन चालक वाहन मालक यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा तालुक्यातील सर्व गौण खनिज वाहतूक करणारे वाहन चालक वाहन मालक यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
*अक्कलकुवा तालुक्यातील सर्व गौण खनिज वाहतूक करणारे वाहन चालक वाहन मालक यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मागील तीन दिवसांपासून अक्कलकुवा येथील पोलीस प्रशासनाकडून गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना थांबविण्यात येत आहे. वास्तविक शासनाच्या धोरणानुसार शासकीय कामावर वापरासाठी घेऊन जात असलेल्या वाहनावर पोलीस विभागाकडून कारवाई करता येत नाहीं. तसेच पोलिसांनी असे कोणतेही वाहन पकडल्यास पुढील कार्यवाहीसाठी व तपासासाठी संबंधित तहसीलदार यांना वाहन ताब्यात द्यावे असे जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी पोलीस प्रशासनाला पत्र दिले असतांना, शासनाच्या आदेशाला न जुमानता व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या पत्राला किंमत न देता. सहा. पोलीस अधिक्षक दर्शन दुग्गड यांनी थांबाविलेल्या रेतु वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी न देता, किंवा तहसीलदार यांना रिपोर्ट सादर न करता पोलीस कर्मचाऱ्याला सूचना देऊन अन्यायकारकरित्या कलम 303 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या पार्शवभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील सर्व गौण खनिज वाहतूक करणारे वाहन चालक वाहन मालक यांनी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करीत आमदार आमश्या पाडवी यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना लेखी तक्रार सादर करून संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्यात यावी व तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सदर कार्यवाही न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे.