*पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात रस्ते वीज आरोग्य शिक्षण पिण्याचे पाणी यासह विविध विकास कामांसाठी वीस कोटींपेक्षा अधिक रुपयांचा भरीव निधी जिल्हा नियोजन

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात रस्ते वीज आरोग्य शिक्षण पिण्याचे पाणी यासह विविध विकास कामांसाठी वीस कोटींपेक्षा अधिक रुपयांचा भरीव निधी जिल्हा नियोजन
*पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात रस्ते वीज आरोग्य शिक्षण पिण्याचे पाणी यासह विविध विकास कामांसाठी वीस कोटींपेक्षा अधिक रुपयांचा भरीव निधी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून मंजूर*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-राज्याचे कृषिमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात रस्ते वीज आरोग्य शिक्षण पिण्याचे पाणी यासह विविध विकास कामांसाठी वीस कोटींपेक्षा अधिक रुपयांचा भरीव निधी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून मंजूर केल्याने त्यांचे जाहीर आभार प्रकट करीत मंजूर झालेल्या विविध विकास कामांची माहिती आमदार आमश्या पाडवी यांनी सांगत येत्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही मी आभार प्रकटीकरणाच्या ठराव मांडणार असल्याचे त्यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. विशेषतः मतदार संघातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील प्रस्तावित संपूर्ण 106 अंगणवाड्यांना तब्बल 13 कोटी रुपयांच्या निधी मंजूर केल्याने दुर्गम भागातील बालकांसाठी मोठी सुविधा होईल असेही आमदार पाडवी यांनी यावेळी प्रकर्षाने यावेळी नमूद केले. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात आमदार आमश्या पाडवी प्रथमतःच निर्वाचित झाल्यानंतर स्थापन झालेल्या महायुतीच्या शासनातील राज्याचे कृषिमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी प्रस्तावित केलेल्या विविध विकास कामांसाठी तब्बल वीस कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर केल्याने त्यांचे आभार व्यक्त करीत मंजूर केलेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी आमदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, स्व जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद केली नाही मात्र या महायुतीच्या शासनातील जिल्ह्याचे राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून धडगाव तालुक्यात 76 व अक्कलकुवा तालुक्यात 30 अशा एकूण 106 अंगणवाड्यांचे प्रस्ताव सादर केले असता ते सर्वच्या सर्व प्रस्ताव मंजूर करून तब्बल 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला यामुळे या तालुक्यातील दुर्गा माते दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतर प्रथमतः बालकांसाठी अंगणवाड्यांची सुविधा होणार असल्याने ही मोठी जमेची बाजू आहे मतदार संघात विद्युतीकरणासाठी 50 विद्युत रोहित्र मंजूर केले असून त्यासाठी दोन कोटी 14 लक्ष रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहीर येथे तीर्थक्षेत्र विकास विकास योजनेच्या माध्यमातून आदिवासी सांस्कृतिक भवन व देवमोगरा मातेच्या भव्य मंदिर बांधकामासाठी एक कोटी तसेच सोरापाडा येथील श्री महाकाली मातेच्या मंदिर संरक्षण भिंतीसाठी तीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील दोन रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी 50 लाख असा एकूण एक कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे अग्नी उपद्रव आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक पातळीवर तीस ग्रामपंचायतींना 30 पाण्याची टँकर ऑइल इंजिन सह मंजूर करून निधी देण्यात आला आहे अक्कलकुवा धडगाव तालुक्यात दुर्गम भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 45 हात पंप मंजूर करून त्यासाठी 36 लक्ष रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. मतदार संघातील जीर्ण अवस्थेतील पडक्या शाळांचे इम्पॅथी फाउंडेशन तर्फे अद्ययावत बांधकाम केले जाणार आहे प्रायोगिक तत्त्वावर अक्कलकुवा तालुक्यातील खापर काकडकुंड व धडगाव तालुक्यातील जुने धडगाव, मांडवी येथील जिल्हा परिषद शाळांचे बांधकाम केले जाणार आहे विद्युतीकरणासाठी कोयलीविहीर, पेचरीदेव, देवमोरानगर येथे विद्युत उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहेत तसेच आरोग्य सुविधेसाठी नवीन 15 आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी देण्यात आली असून अक्कलकुवा तालुक्यात मकराणी फळी, मिठाफळी, केशवनगर, घंटाणी कंकाळामाळ, मोजापाडा येथे तर धडगाव तालुक्यातील खांबला, खांडबारा, खर्डा, लेगापाणी, सिंधीदिगर, कात्री 2 कात्री 3 येथे मंजूर करण्यात आले आहेत. जन सुविधांसाठी तर लाख रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आल्याचेही सांगितले यावेळी शिवसेना शिंदे गट जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मण वाडीले जिल्हा युवा अधिकारी ललित जाट तालुकाप्रमुख तुकाराम वळवी शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल डा. दिनेश खरात उपस्थित होते. खापर ते आमलीफळी दरम्यान देहली नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या पुलाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी भरीव साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या पुलाची निविदा प्रक्रिया झाल्याचेही यावेळी सांगितले. तालुका क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपये मंजूर असून त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सावरिया दिगर येथील रखडलेल्या पुलाचे बांधकाम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू असून देहली प्रकल्पाच्या कामासाठी ही पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या कोणाकडून विकास निधी आणता येईल त्यांच्याकडे मागणी करून व मतदार संघात आवश्यक असलेल्या सुविधा मिळवण्यासाठी प्रत्यक्ष मतदार संघात आणून वस्तुस्थिती दाखवून विकासासाठी कुठलीही तमा न बाळगता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार आमश्या पाडवी यांनी यावेळी सांगितले.