*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी, शासकीय इंग्रजी माध्यमाच्या निवासी आश्रमशाळेत प्रवेश सुरू*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी, शासकीय इंग्रजी माध्यमाच्या निवासी आश्रमशाळेत प्रवेश सुरू*
*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी, शासकीय इंग्रजी माध्यमाच्या निवासी आश्रमशाळेत प्रवेश सुरू*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार यांच्या कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर आणि शहादा या तीन तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय इंग्रजी माध्यमाच्या निवासी आश्रमशाळा नंदुरबार नवापूर व येथे इयत्ता 1 ली साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबारचे मुख्याध्यापक निर्मल माळी व नवापूरचे मुख्याध्यापक के. आर. गावीत यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रम शाळेत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देण्यात येणार असून इच्छुक विद्यार्थ्यांना 4 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 दरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, खामगांव रोड नंदुरबार व शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नवापूर येथे कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) प्रवेश अर्ज मिळतील व स्विकारण्यात येतील. प्रवेशासाठी अटी: योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवाशी दाखला पालक/पाल्य विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचा दाखल्याची साक्षाकित प्रत जोडावी. विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्या संबंधित यादीतील अनुक्रमांक नमूद करण्यात यावा. व दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत जोडावी. अर्जदार विद्यार्थ्यांचे पालक मयत असल्यास त्याबाबत मृत्यू प्रमाणपत्र जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतची हमीपत्र जोडावे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांचा पाल्याच्या विनंती अनुसार शाळा बदलता येणार नाही याबाबतचे हमीपत्र जोडावे. पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे अर्जासोबत आर्थिक वर्ष 2024 -25 चे उत्पन्नाचा दाखला जोडावा. प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या बालकाचा जन्माचा दाखला जोडावा. अर्जासोबत बालकाचे नजीकच्या कालावधीतील काढलेले 02 पासपोर्ट फोटो जोडावे. अर्जासोबत विद्यार्थी तसेच आई वडील यांचे आधार कार्ड जोडावे. विद्यार्थी व पालक यांना अटी व शर्ती व नियम बंधनकारक राहतील. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.
इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी वरील कागदपत्रांसह विहित वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहनही शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबारचे मुख्याध्यापक माळी व नवापूरचे मुख्याध्यापक गावीत यांनी केले आहे.