*देवरे विद्यालयात शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
*देवरे विद्यालयात शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय ग्रेड चित्रकला इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत विद्यालयाचा निकाल 100% लागला असून अनुक्रमे इलेमेंटरी परीक्षेत 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले ज्यात सुवर्णा दिगंबर पाटील हिने अ श्रेणी तर दीपेश लोहार, नंदराज मराठे देवर्षी पाटील यांना ब श्रेणी तर पंधरा विद्यार्थ्यांना क श्रेणी संपादन करत सुयश संपादन केले. 15 विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण झाले ज्यात सहा विद्यार्थ्यांनी ब श्रेणी तर दहा विद्यार्थ्यांनी क श्रेणी प्राप्त करत सुयश संपादन केले. यशस्वितांना विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके, चित्रकला शिक्षिका एस.एच. गायकवाड, व्ही.बी. अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.