*नंदुरबार शहरातील दंगलग्रस्त भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी इ.10 वी 12 वी व इतर परिक्षा केंद्ररद्द करणेबाबतचे शिवसेनेचे निवेदन*
![](https://jaymalharnews.com/upload/173876686551.jpg)
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार शहरातील दंगलग्रस्त भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी इ.10 वी 12 वी व इतर परिक्षा केंद्ररद्द करणेबाबतचे शिवसेनेचे निवेदन*
*नंदुरबार शहरातील दंगलग्रस्त भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी इ.10 वी 12 वी व इतर परिक्षा केंद्ररद्द करणेबाबतचे शिवसेनेचे निवेदन*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार शहरातील दंगलग्रस्त भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी इ.10 वी 12 वी व इतर परिक्षा केंद्र रद्द करणेबाबतचे निवेदन शिवसेना उबाठा पक्षामार्फत महानगर प्रमुख पंडित माळी यांनी दिले आहे. शिवसेना उबाठा पक्षामार्फत परीक्षेच्या संदर्भात जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त व पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांना महानगरप्रमुख पंडित माळी व उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी यांनी निवेदन दिले आहे. याबाबत निवेदनातील विषय असा. नंदुरबार शहरातील दंगलग्रस्त भागात येणाऱ्या काळात परिक्षा केंद्र रद्द करण्यात यावे. कारण 2016 साली परिक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्या कारणावरुन मोठी दंगल झाली होती या दंगलीत विद्यार्थ्यांची धावपळ सोबत मोठी वित्त हानी झाली होती व अनेकांना दुखापतीमुळे जायबंद व्हावे लागले होते शिवाय या परिसरात हिंदू, मुस्लीम, बौध्द व आदिवासी वस्ती एकत्र राहते यात अत्यंत दाट व मिश्र वस्तीत रस्ता व पार्किंग नसल्यामुळे नविन विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीला सामोरे जावे लागते.
मागच्या तीन महिन्यापुर्वी या परिसरात मोठी दंगल झाली असतांना मागच्या आठवडयातील घटनेमुळे आजही तणाव कायम असल्याचे दिसते या परिसरातील स्वामी विवेकानंद हायस्कुल, ॲग्लो उर्दू हायस्कुल, व नॅशनल उर्दू हायस्कुल या तिन्ही शाळेवर सन 2024-25 च्या इ. 10 वी व 12 वी च्या परिक्षा केंद्र रद्द करुन परिक्षार्थीना इतर तणावमुक्त परिसरात परिक्षा घेणे योग्य राहिल. कायदा व सुव्यवस्था कारणामुळे या परिसरात परिक्षा केंद्र घेणे धोकेदायक राहील याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.